तुळजापूर रोड नाका पुलाखाली परप्रांतीयांना आश्रय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

विशेष म्हणजे तामीळनाडू, प.बंगाल आदी राज्यातून अनेक परप्रांतीय पायी चालत सोलापुरात पोचले आहेत. या परप्रांतीयांना उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार आदी राज्यात त्यांच्या मुळगावी जायचे आहे. एक हजार पेक्षा अधिक लोकांनी या पुलाखाली आश्रय घेतला आहे.

सोलापूर - शहरातील तुळजापूर नाका पुलाखाली एक हजार पेक्षा अधिक परप्रांतीयानी आश्रय मिळवला आहे. परप्रांतीयांची संख्या पाहून येथून आतापर्यंत 18 बसगाड्याद्वारे त्यांना त्यांच्या राज्याच्या सिमेवर सोडून देण्याचे काम सूरू आहे.

मागील काही दिवसापासून शहरात परप्रांतीयाचे जत्थे दाखल होत आहेत. सोलापुर शहरासह पंढरपूर, सांगोला, बार्शी, मोहोळ, करमाळा आदी अनेक तालुक्‍यात काम करणाऱ्या परप्रांतीयांना लॉकडाउनमध्ये त्याच्या गावी जाण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नाहीत.

विशेष म्हणजे तामीळनाडू, प.बंगाल आदी राज्यातून अनेक परप्रांतीय पायी चालत सोलापुरात पोचले आहेत. या परप्रांतीयांना उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार आदी राज्यात त्यांच्या मुळगावी जायचे आहे. एक हजार पेक्षा अधिक लोकांनी या पुलाखाली आश्रय घेतला आहे. दररोज या ठिकाणी पुलाखाली थांबुन वाहनाची वाट पाहत असतात. त्यांची वाढती संख्या पाहून या ठिकाणी मनपाने एक पिण्याच्या पाण्याची टाकी बसवली आहे. तसेच मनपा व काही सामाजीक कार्यकर्ते या ठिकाणी फूड पॅकेटस उपलब्ध करून देतात. खाजगी वाहने या ठिकाणी थांबुन काही राज्यातील लोकांना घेऊन जात आहेत.

उत्तर सोलापुरचे तहसीलदार जयंत पाटील, सहायक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी सतीश जाधव आदींनी या परप्रांतीयासाठी मोफत एसटी बस पाठवण्याचे काम चालवले आहेत. आतापर्यंत एकूण 18 बसद्वारे त्यांना त्यांच्या राज्याच्या सिमेवर सोडण्यात आले आहे. सामाजीक कार्यकर्ते सचिन कांबळे हे या प्रवाशांच्या ऑनलाईन पास व प्रशासनाला माहिती देण्यासाठी मदत करीत आहेत. 

अजूनही परप्रांतीयाची या पुलाच्या ठिकाणी गर्दी कायम आहे. शनिवारी (ता.23) एकूण 70 परप्रांतीय हजर झाले होते. त्यातील राजस्थानचे आठच जण असल्याने त्यांच्यासाठी एसटी करणे अशक्‍य झाले. त्यांच्या साठी रेल्वे ची सोय होण्याची शक्‍यता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shelter for foreigners under Tuljapur Road Naka Bridge