शिवसेनेने मागितली एकच महिला- बालकल्याण समिती ! एमआयएम अन्‌ वंचित आघाडी ठरणार किंगमेकर 

1poli_tics_2 (2).jpg
1poli_tics_2 (2).jpg
Updated on

सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांचे सभापती महाविकास आघाडीचेच व्हावेत, या हेतूने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम एकत्र आली आहे. सत्ताधारी भाजपला विषय समित्यांपासून दूर ठेवण्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेने महिला व बालकल्याण ही एकच समिती मागितली आहे. तर 'एमआयएम' ही त्याच समितीवर ठाम राहिल्याने पहिली बैठक फिस्कटली आहे. या बैठकीसाठी वंचित बहूजन आघाडीचे कोणीच उपस्थित नसल्याचेही दिसून आले. 

महापालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ 

  • भाजप : 49 
  • शिवसेना : 21 
  • कॉंग्रेस : 14 
  • एमआयएम : 9 
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 4 
  • वंचित आघाडी : 3 


राज्यात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले झाले. त्यानंतर स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचा विरोध कायम होता. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकी निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर सोलापूर महापालिकेत विषय समित्या निवडी भाजपला सोबत घेऊन बिनविरोध करण्याचा डाव मोडण्यात आला आहे. आमदार संजय शिंदे यांनी पुन्हा मध्यस्थी करीत एमआयएमला सोबत घेऊन सर्व विषय समित्या बिनविरोध महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्‍वास बैठकीत व्यक्‍त केला. सकारात्मक बैठकीत एमआयएम, मात्र महिला व बालकल्याण समितीवर ठाम राहिल्याने आता उद्या (रविवारी) पुन्हा बैठक घेण्याचे ठरली आहे. दरम्यान, महापालिकेत संख्याबळात दुसऱ्या क्रमांवर असलेल्या शिवसेनेने एकच समिती मागून अन्य पक्षांच्या मागणीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कॉंग्रेसने स्थापत्य समिती मागितल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व वंचित बहूजन आघाडीला प्रत्येकी एक, कॉंग्रेस आणि एमआयएमला प्रत्येकी दोन समित्या देण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. 
 


'एमआयएम' व 'वंचित' ठरणार किंगमेकर 
विषय समित्या निवडीत नऊ मतांपैकी भाजपकडे चार मते असून उर्वरित शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएम या पाच पक्षांकडे पाच मते आहेत. भाजपने यापूर्वीच कॉंग्रेसला चार विषय समित्यांची ऑफर दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीत सन्मान न मिळाल्यास आघाडीत बिघाडी करण्याची तयारीही कॉंग्रेसने ठेवल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी, वंचित बहूजन आघाडी अथवा एमआयएम या दोघांपैकी एका पक्षाने भाजपला साथ दिल्यास महाविकास आघाडीला एकही समिती मिळत नाही. 21 डिसेंबरला सभापती पदांसाठी अर्ज भरले जाणार असून 22 डिसेंबरला निवडी होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता एमआयएम व वंचित बहूजन आघाडी किंगमेकर ठरणार असल्याने ते कोणासोबत हातमिळविणी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com