esakal | सभागृहनेते करलींना डच्चू अन्‌ शिवानंद पाटलांना मिळणार संधी ! महापालिकेचे आगामी बजेटपूर्वी निवड 

बोलून बातमी शोधा

caFjaa6y_400x400 - Copy.jpg}

विरोधी पक्षातील नाराजांना भाजपकडून ऑफर 
महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मागील चार वर्षांच्या कार्यकाळात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांची नाराजी दूर करणे, विरोधी पक्षातील नाराजांना हेरून त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असून त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत न्याय देण्याचे आश्‍वासनही दिले जात असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये येणाऱ्या इच्छुकांची नावे सांगण्यापेक्षा लवकरच सर्वांना समजेल, असेही भाजपमधील एका नेत्याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सभागृहनेते करलींना डच्चू अन्‌ शिवानंद पाटलांना मिळणार संधी ! महापालिकेचे आगामी बजेटपूर्वी निवड 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेचा सभागृहनेता ठरविताना एक वर्षाचीच मुदत ठरली होती. विद्यमान सभागृहनेते श्रीनिवास करली यांचा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्या ठिकाणी आता शिवानंद पाटील यांची निवड करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत. कोरोनामुळे आपल्याला मनासारखे काम करण्याची संधी न मिळाल्याने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करलींनी केली. मात्र, ठरल्याप्रमाणे मुदतवाढ देणे अशक्‍य असून नव्या सभागृहनेत्यांच्या बाबतीत भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींकडे विचारणा केल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षातील नाराजांना भाजपकडून ऑफर 
महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मागील चार वर्षांच्या कार्यकाळात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांची नाराजी दूर करणे, विरोधी पक्षातील नाराजांना हेरून त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असून त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत न्याय देण्याचे आश्‍वासनही दिले जात असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये येणाऱ्या इच्छुकांची नावे सांगण्यापेक्षा लवकरच सर्वांना समजेल, असेही भाजपमधील एका नेत्याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कोरोनामुळे लांबणीवर पडलेले बजेट सत्ताधाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच सभागृहात मांडले. त्यावेळी आपल्याला कार्यकाळात एकदाही बजेट मांडता आले नसल्याची खंत करली यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे व्यक्‍त केली. त्यामुळे त्यांना बजेट मांडण्याची संधी मिळावी, म्हणून वर्ष होऊनही त्यांना काही दिवस त्या पदावर ठेवण्यात आले. मात्र, करलींना सभागृहनेते करताना त्यावेळी एक वर्षाचाच कालावधी निश्‍चित झाला होता आणि त्यानुसारच त्यांना संधी देण्यात आली होती, असे पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षातील प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या पदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा असते. त्यामुळे पदे मोजकीच आहेत, परंतु इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर करली यांनी मान्य न होणारा हट्ट न करता स्व:ताहून त्या पदावरून पायउतार व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिल्याची चर्चा आहे.