शिवसेनेला सोलापुरसाठी मिळेना संपर्कप्रमुख ! विधानसभेनंतर आमदार तानाजी सावंत संपर्काबाहेर; शंभुराजे नवे संपर्कमंत्री

4udhhav_20thackrey_20tanaji_20sawant_0.jpg4udhhav_20thackrey_20tanaji_20sawant_0.jpg
4udhhav_20thackrey_20tanaji_20sawant_0.jpg4udhhav_20thackrey_20tanaji_20sawant_0.jpg

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार शिवेसनेचेच निवडून येतील, अशी ग्वाही आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली. मात्र, जिल्ह्यातील सहापैकी सांगोला वगळता एकाही ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले नाही. हा पराभव जिव्हारी लागला, त्यातच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल ही त्यांची आशाही फोल ठरली. तेव्हापासून संपर्कप्रमुख तानाजी सावंत संपर्काबाहेरच असून त्यांचे बंधू जिल्हा सन्मवयक हेही दिसले नाहीत, अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

पक्षप्रमुखांकडेच आहे राज्याची दोरी;
तरीही वाढतेय पदाधिकाऱ्यांमध्ये दरी

राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे. पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाल्याने भाजप- शिवसेनेची सत्ता असताना अडगळीला पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील उत्साह वाढला. मात्र, जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांचे काम, महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ संपर्कप्रमुख असायला हवा. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवून घेण्यासाठी मोठी मदत होते. मात्र, संपर्कप्रमुखच संपर्काबाहेर असून जिल्हा समन्वयकही सोलापुकरडे फिरकत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नव्या संपर्कप्रमुखांची मागणी केल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप नवा संपर्कप्रमुख नियुक्‍त करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाहीत.


राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी स्थापन केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात दोन्ही कॉंग्रेस यशस्वी ठरले. शिवसेनेचे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री केल्याशिवाय पक्षातील नाराजी दूर होणार नाही, असा विश्‍वास दोन्ही कॉंग्रेसमधील नेत्यांना होता. त्यानुसार उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, तर पर्यटन मंत्री तथा अन्य विभागाचे मंत्री म्हणून तानाजी सावंत यांची चर्चा होती. मात्र, आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिल्याने सावंत यांचा भ्रमनिराश झाला. तत्पूर्वी, मोहोळ, करमाळा, शहर मध्यमध्ये उमेदवारी देताना बंडखोरी होणार नाही, याची माहिती असतानाही सावंतांनी नाराजांची नाराजी दूर केली नाही. दुसरीकडे बार्शीतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माढा मतदारसंघात सावंत यांच्या कुटुंबियांचे राजकारण असूनही तिथे पक्षाला यश मिळाले नाही. त्यानंतर उमेदवारी देताना सावंतांनी मनमानी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केली. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करुन त्यांच्या पुन्हा समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने संपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयकांच्या माध्यमातून प्रयत्न अपेक्षित होते. मात्र, तसे प्रयत्न न झाल्याने राज्यात सत्ता असतानाही पदाधिकाऱ्यांना सत्तेचा फिल येत नसल्याचे चित्र आहे.


संपर्कमंत्रीही महिन्यातच बदलला 
संपर्कप्रमुख आणि जिल्हा समन्वयक हे दोघेही संपर्काबाहेर गेल्यानंतरही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढावा, पक्षसंघटन मजबूत व्हावे, या हेतूने पक्षप्रमुखांनी संपर्कमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांची नियुक्‍त केली. मात्र, नगर जिल्ह्यातच रमलेले गडाख यांना सोलापुरसाठी वेळच नसल्याने पक्षाने ही जबाबदारी गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे सोपविली. त्यांनी नुकताच दौरा केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वजण ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com