esakal | धक्कादायक ! प्रॉपर्टीच्या वादातून मोठ्या भावाचा लहान भावावर जीवघेणा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

images.png

फरार संशयित आरोपीचा शोध सुरु
प्रॉपर्टीच्या वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावावर चाकूने हल्ला केला आहे. पोटावरील जखम गंभीर असल्याने 307, 504 आणि 506 कलमाअंतर्गत धनंजय मानेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
- इंद्रजित वर्धन, सहायक पोलिस निरीक्षक, सलगर वस्ती पोलिस ठाणे

धक्कादायक ! प्रॉपर्टीच्या वादातून मोठ्या भावाचा लहान भावावर जीवघेणा हल्ला

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शेती व जागेच्या वाटणीवरुन मोठ्या भावानेच लहान भावाच्या पोटावर चाकूने खुनी हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (ता. 22) घडली असून रात्री उशिरा धनंजय संभाजी माने (रा. रामवाडी) याच्याविरुध्द सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

फरार संशयित आरोपीचा शोध सुरु
प्रॉपर्टीच्या वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावावर चाकूने हल्ला केला आहे. पोटावरील जखम गंभीर असल्याने 307, 504 आणि 506 कलमाअंतर्गत धनंजय मानेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
- इंद्रजित वर्धन, सहायक पोलिस निरीक्षक, सलगर वस्ती पोलिस ठाणे

रामवाडी परिसरात राहणारे संजय माने हे घटनेच्या दिवशी घरी होते. त्यावेळी दुपारी साडेतीनच्या सुमारास धनंजय संभाजी माने हा घरी आला. संजय माने हे त्यांच्या मित्रांसमवेत बोलत होते. दरम्यान, धनंजय हा त्याठिकाणी आल्यानंतर मोरे काका यांनी आई कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी धनंजय याने शिवीगाळ सुरु केली. संजय माने हे घराजवळील स्क्रॅबच्या दुकानात बसले होते. त्यांनाही धनंजयने शिवीगाळ सुरु केली आणि माझ्या प्रॉपर्टीची वाटणी करतो का, तुला खल्लास करुन तुझा वंश संपवितो, तुझा शेवट मी करणार आहे असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर संजय यांच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन पोटात चाकू खुपसला. हल्ल्यानंतर संजय हे जवळील रिक्षा स्टॉपवर जात असताना त्याठिकाणी लोकांची गर्दी जमली. गर्दी पाहून धनंजय हा त्याच्याकडील दुचाकीवरुन तिथून पसार झाला. तत्पूर्वी, तो फिर्याद तथा संजय यांची पत्नी स्मिता यांच्या अंगावरही चाकू घेऊन धावून आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित वर्धन हे करीत आहेत.