बनावट कागदपत्रांद्वारे अवैध धंदेवाल्यांना सिमकार्ड विक्री ! दुकानदारासह सहाजणांना अटक, 13 जण फरार 

Sim Card
Sim Card
Updated on

सोलापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिमकार्ड अवैध धंदेवाल्यांना विकणाऱ्या दुकानदारासह सहा जणांना सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. दुकान मालक गोपाल मुंदडा (रा. सोलापूर), राजेंद्र नागनाथ मल्लुरे (वय 37, रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती, सोलापूर), स्वामी दुर्गा वरगंटी (रा. भवानी पेठ, वैद्यवाडी, सोलापूर), कमलकिशोर नंदकिशोर अट्टल (वय 38, रा. गुरुदत्त चौक, घोंगडे वस्ती, सोलापूर), नागेश सुभाष येळमेली (वय 32, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर), महांतय्या गुरय्या स्वामी (वय 32, रा. जंगम वस्ती, अक्‍कलकोट रोड, गारवा हॉटेलमागे, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. 

शहरात अवैध धंदे करणाऱ्यांना दुसऱ्याचे नावे असलेले सिमकार्ड काही मोबाईल सिमकार्ड विकणाऱ्यांकडून बनावट कागदपत्रे तयार करून विकले जात असल्याबाबत आयुक्‍तालयातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज आला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला. तेव्हा बलिदान चौकातील खाऊघर जनरल स्टोअर्सचे मालक गोपाल मुंदडा यांच्या दुकानाची चौकशी केली असता मुंदडा हे विविध कंपन्यांचे सिमकार्ड ऍक्‍टिव्हेट करून विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. 
त्यावरून पोलिसांनी खाऊघर दुकानावर छापा मारला असता त्याच्या दुकानातून विविध कंपन्यांचे जाहिरात पत्रक, रिचार्ज प्लॅन बोर्ड, 13 मोबाईल हॅंडसेट, 12 सिमकार्ड मिळून आले. 

मुंदडा याने असे बनावट सिमकार्ड विकलेल्या राजेंद्र मल्लुरे, स्वामी वरगंटी, कमलकिशोर अट्टल, नागेश येळमेली, महांतय्या स्वामी यांनादेखील अटक करून त्यांच्याकडून बनावट सिमकार्ड जप्त केले आहेत. तसेच मुंदडा याने अनेक जणांना अशाप्रकारचे सिमकार्ड विकले असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक वीरेंद्रसिंग बायस, नागेश होटकर, हवालदार श्रीरंग कुलकर्णी, पोलिस नाईक सचिन गायकवाड, संतोष येळे, बाबू मंगरुळे, वसीम शेख, अर्जुन गायकवाड, अमोल कानडे, करण माने, इब्राहिम शेख, राठोड, पिरजादे यांनी केली. 

दुकानमालक गोपाल मुंदडा हा विविध बहाण्याने पुन्हा एकदा ग्राहकांचे फोटो घेऊन व त्यांचीच कागदपत्रे घेऊन त्यांचा गैरवापर करून ग्राहकाच्या नावावर सिमकार्ड कार्यान्वित करीत असे. त्यानंतर ते सिमकार्ड जादा दराने अवैध धंदे करणाऱ्यांना विकत असे, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणातील अवैध धंदे करणाऱ्या 13 जणांची नावे पोलिसांकडे असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com