अक्कलकोटमधील दुकाने सोमवारपासून उघडणार

 Shops in Akkalkot Opening Monday
Shops in Akkalkot Opening Monday
Updated on

अक्कलकोट ः अक्कलकोटला गेली अडीच महिने अत्यावशक सेवा वगळून बंद असलेले सर्व व्यवहार येत्या सोमवारपासून सम व विषम पद्धतीने सुरू होणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली. 

येथील नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेत कधी प्रशासन तर कधी व्यापाऱ्यांनी निर्णय घेत जागरूकता म्हणून येथील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे लॉकडाउन काळात कित्येक व्यापारी आणि तिथे काम करणारे कामगार या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होत आले आहे.

व्यापारी वर्गाचे बॅंक कर्ज, व्याज, वीज बिल व इतर कर आणि खर्च हे पदरमोड करून करावे लागले आहेत. असे असूनही व्यापाऱ्यांनी समाजहित व सुरक्षितता याला प्राधान्य देत नुकसान सोसून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व्यवहार बंद ठेवले आहेत 

दरम्यान, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत ठरल्यानुसार (ता. 6) सर्व व्यापारी बंधूना आपापली दुकाने साफ सफाई करण्यासाठी सकाळी 7 ते 2 या वेळेत उघडून सोमवारपासून सम विषम याप्रकारे शासन नियमानुसार दुकानाची आखणी करून उघडण्याची मुभा देण्यात आली आहे.

दर रविवारी जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे. अक्कलकोटला आता सात कोरोना बाधित रुग्ण उपाचार घेत आहेत त्यामुळे येथे सुरू केले जाणारे व्यवहार अंत्यत काळजीपूर्वक करावे लागणार आहेत अन्यथा पून्हा धोका हा संभवू शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com