esakal | शहरातील दुकाने आता नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार ! सिनेमागृहांना अद्यापही टाळेच 
sakal

बोलून बातमी शोधा

2Shops_Open.jpg

आदेशातील ठळक बाबी... 

  • शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व अत्यावश्‍यक वस्तूंची दुकाने, सेवा त्यांच्या वेळेत सुरु राहतील 
  • महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने (अत्यावश्‍यक सेवा देणारी दुकाने वगळून) अन्य दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील 
  • शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्‍सही सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंतच राहतील सुरु; सिनेमागृहे बंदच राहणार 
  • सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वच आस्थापना चालकांना राहणार बंधनकारक

शहरातील दुकाने आता नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार ! सिनेमागृहांना अद्यापही टाळेच 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : दसरा, दिवाळी, लग्नसराई तोंडावर असल्याने व्यापाऱ्यांना दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी परवानगी देण्यात आली आहे. आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी आता नुकताच आदेश काढला. सिनेमागृहे मात्र बंदच राहतील, असेही आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे. 

शहरातील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्‍स आता नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचनाही आयुक्‍तांनी दिल्या आहेत. ज्या ग्राहकांकडे मास्क नाही, त्यांना दुकानातील वस्तू विक्री करु नये, अशी सक्‍त ताकीदही आयुक्‍तांनी दिली आहे. शहरातील कोरोनाची स्थिती आता सर्वांच्या सहकार्यातून सुधारू लागली आहे. आगामी काळात शहर कोरोनामुक्‍त करण्याच्या हेतूने व्यापाऱ्यांसह सोलापुकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्‍तांनी यावेळी केले. दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारच्या आदेशानुसार हॉटेल, बार, रेस्टॉरंन्टसाठी रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुकानांना सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंतच परवानगी होती. त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयुक्‍तांना निवेदन देऊन वेळ वाढवून देण्याची मागणी केली. तत्पूर्वी, त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम यांना निवेदन दिले होते.

आयुक्‍तांचे धन्यवाद; व्यापाऱ्यांकडून होईल नियमांचे पालन 
सणासुदीचे दिवस तोंडावर असून कोरोनाच्या लॉकडाउन काळात व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्याचा वेळ वाढवून मिळावा म्हणून लोकप्रतिनिधींसह महापालिका आयुक्‍तांना निवेदने दिली होती. त्याची दखल घेऊन आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दुकानांचा वेळ वाढविला आहे. व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे तंतोतंत पालन होईल, अशी ग्वाही चेंबर ऑफ कॉमर्सने दिली आहे. व्यापाऱ्यांसह लहान दुकानदारांनाही तसे आवाहन करण्यात आले आहे. 
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर