श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार; मंदिर समितीचा निर्णय

अभय जोशी 
Tuesday, 1 September 2020

राज्य शासनाने राज्यातील लॉकडाउन वाढवून सर्व धार्मिक स्थळे 30 सप्टेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर देखील 30 सप्टेंबरपर्यत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र "श्रीं'चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवण्यात येत आहेत. इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. मंदिर समितीच्या सर्व सदस्यांशी विचारविनिमय करून समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 17 मार्चपासून बंद असलेले येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर आता 30 सप्टेंबरपर्यत बंदच ठेवण्याचा निर्णय आज श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून मंदिर समितीने भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे. दरम्यान, परवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तर काल विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.

तथापि, राज्य शासनाने राज्यातील लॉकडाउन वाढवून सर्व धार्मिक स्थळे 30 सप्टेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर देखील 30 सप्टेंबरपर्यत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र "श्रीं'चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवण्यात येत आहेत. इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. मंदिर समितीच्या सर्व सदस्यांशी विचारविनिमय करून समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Shri Vitthal-Rukmini Temple will remain closed till September 30