देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे : सुशीलकुमार शिंदे यांची टीका 

अभय जोशी 
Saturday, 10 October 2020

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियातून फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. सोशल मीडियाच्या अशा पध्दतीच्या चूकीच्या वापराचा आपल्यालाही फटका बसला आहे. सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन काही मंडळी भडक विधाने करुन समाजात फूट पाडत असले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस आपला पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यात पुन्हा सत्ता येणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत त्याकडे श्री.शिंदे यांचे लक्ष वेधले असता भाजपवाल्यांना स्वप्ने बघण्याची सवय असल्याचा टोला श्री.शिंदे यांनी लगावला. 

पंढरपूर : देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. कनव्हर्टड फॉर्म ऑफ डेमॉक्रॉसी जी आहे तीच मोठ्या प्रमाणावर आता सुरु झाली आहे. या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बेबंदशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ती प्रक्रिया सुरु झाली आहे.हाथरस सारख्या एक नाही तर अनेक घटना आहेत. अशा परिस्थितीत सर्व विरोधी पक्ष मात्र विस्कटलेला आहे. सर्वांनी भेदभाव विसरुन राष्ट्रासाठी एकत्र आले पाहिजे असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

श्री. शिंदे यांनी आज जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते ,माजी आमदार (कै.) सुधाकरपंत परिचारक, भागवताचार्य वा.ना. उत्पात, ह.भ.प. रामदास महाराज जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (कै.) राजूबापू पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पंढरपूर येथे पत्रकारांनी भेटून त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. 

श्री.शिंदे म्हणाले, हाथरस एक नाही अनेक आहेत. महिलांवरील अत्त्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. देशातील स्थिती चिंता वाढवणारी आहे. मी केंद्रीय गृहमंत्री असताना कारवाई करत होतो त्यावेळी हेच लोक आमच्यावर टिका करत होते याची आठवण श्री. शिंदे यांनी करून दिली. 

ते म्हणाले, देशातील सध्याचे चित्र काही चांगले नाही. गरीब माणसाला राहणे मुश्‍कील झाले आहे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. तरुणांना वाव राहिलेला नाही. सर्व विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. सर्वांनी भेदभाव विसरुन राष्ट्रासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत श्री.शिंदे यांनी व्यक्त केले. 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियातून फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. सोशल मीडियाच्या अशा पध्दतीच्या चूकीच्या वापराचा आपल्यालाही फटका बसला आहे. सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन काही मंडळी भडक विधाने करुन समाजात फूट पाडत असले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस आपला पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यात पुन्हा सत्ता येणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत त्याकडे श्री.शिंदे यांचे लक्ष वेधले असता भाजपवाल्यांना स्वप्ने बघण्याची सवय असल्याचा टोला श्री.शिंदे यांनी लगावला. 

या प्रसंगी सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे, पंढरपूरचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. राजेश भादुले, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते. 

(कै.) सुधाकरपंत परिचारक, भागवताचार्य वा.ना. उत्पात, ह.भ.प. रामदास महाराज जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (कै.) राजूबापू पाटील यांच्या विषयीच्या आठवणींना श्री.शिंदे यांनी उजाळा दिला आणि या सर्वाना श्रध्दांजली अर्पण केली. 

संपादन : अरविंद मोटे 

पंढरपूर : सोलापूर : महाराष्ट्र 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation in the country is on the verge of death: Criticism of Sushilkumar Shinde