हुन्नूरच्या उपसरपंचासह सहा सदस्यांनी केली सरपंचाविरुद्ध मुरूम विकल्याची तक्रार

Goun Khanij
Goun Khanij
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील हुन्नूर येथील शिरनांदगी येथे मुरूमची बेकायदेशीर विक्री केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उपसरपंच प्रवीण साळे व इतर सहा सदस्यांनी ही तक्रार केली असून, शिरनांदगी रस्त्यालगतच्या जमीन गट क्रमांक सहामधील हजारो ब्रास मुरूम सरपंच मनीषा खताळ व त्यांचे पती मच्छिंद्र खताळ यांनी बिरोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्तशी संगनमत करून विनापरवाना बेकायदेशीरीत्या रस्त्याच्या व इतर कामांसाठी विकल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनावर उपसरपंच प्रवीण साळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान माने, शंकर पुजारी, स्मिता काशीद, रतन क्षीरसागर, सरस्वती चव्हाण आदींसह ग्रामस्थ देवराज पुजारी, लक्ष्मण बाळा पुजारी, संतोष क्षीरसागर, प्रशांत साळे, संदीप पवार, सुरेश चव्हाण, शशिकांत काशीद, रविराज खडतरे, देकप्पा माने यांच्या सह्या आहेत. 

निवेदनात म्हटले आहे, की शिरनांदगी या रस्त्यालगत असलेला गट क्रमांक सहा भोगवटदार वर्ग दोन आहे. ही जमीन पूर्णपणे मुरमाड असून या जमिनीमधील मुरूम कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता सरपंच मनीषा खताळ व त्यांचे पती मच्छिंद्र खताळ यांनी येथील बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांशी संगनमत करून परस्पर आर्थिक व्यवहार करून या जमिनीतील अंदाजे हजारो ब्रास मुरूम बेकायदेशीरपणे रस्त्याच्या व इतर कामांकरिता विकला आहे. याबाबत त्यांना बऱ्याच वेळा गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांना न जुमानता हा प्रकार घडत असून, या जमिनीचा भोगवटदार वर्ग दोन असल्याने सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता हा प्रकार घडत आहे. याची चौकशी त्वरित करावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. 

याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे म्हणाले, या संदर्भातील तक्रार प्राप्त झाली असून चौकशीसाठी मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com