अक्कलकोट तालुक्यात आढळले आज नवीन सहा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

अक्कलकोटमध्ये रविवारी (ता. २१) रात्री २० प्रलंबित अहवाल होते. त्यातील १७ अहवाल सोमवारी (ता. २२) सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यातील तब्बल सहा रुग्ण हे पॉझीटिव्ह असून उर्वरित ११ अहवाल निगेटीव्ह आहेत. तर अद्याप तीन अहवाल प्रलंबित राहिले आहेत, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोटमध्ये रविवारी (ता. २१) रात्री २० प्रलंबित अहवाल होते. त्यातील १७ अहवाल सोमवारी (ता. २२) सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यातील तब्बल सहा रुग्ण हे पॉझीटिव्ह असून उर्वरित ११ अहवाल निगेटीव्ह आहेत. तर अद्याप तीन अहवाल प्रलंबित राहिले आहेत, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.
अक्कलकोटला शनिवारी मैंदर्गी, करजगी व अक्कलकोट शहरातील एक रुग्ण तसेच काही आजारी रुग्ण असे मिळून एकूण ५९ स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता. त्यातील ३९ अहवाल नेगेटिव्ह आले होते. उर्वरित २० अहवालाची प्रतीक्षा अक्कलकोटकरांना लागून राहिली होती. त्यात सोमवारी सकाळी सहा कोरोनाबधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अक्कलकोटची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे झालेली पहावयास मिळत आहे. आज आढळलेले नवीन कोरोनाबधित रुग्ण हे बुधवार पेठ अक्कलकोट (१), समर्थ नगर (२),
करजगी (१), मैंदर्गी (१) व सलगर (१) असे आज सहा नवीन कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत.

दृष्टीक्षेपात अक्कलकोट कोरोनाची स्थिती
एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या : 37
एकूण मृत रुग्ण संख्या : 04
एकूण बरे होऊन आलेले रुग्ण संख्या : 09
एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण संख्या : 24
शनिवारी घेण्यात आलेल्या स्वॅबची संख्या 59 असून त्याचे स्वॅब अहवाल खालीलप्रमाणे आहेत.
पॉझीटिव्ह : 06
निगेटीव्ह  :  50
प्रलंबित    :  03


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six new patients were found in Akkalkot taluka today