मंद्रूपमध्ये अवैध वाळूप्रकरणी सहा जणास पोलिस कोठडी

Six people have been remanded in police custody for illegal sand mining in Mandrup
Six people have been remanded in police custody for illegal sand mining in Mandrup

मंद्रूप (ता.दक्षिण सोलापूर) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या सहा जणास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मंद्रुप पोलिसांनी वाळूच्या अवैध व्यवसाय प्रकरणात सहा संशयितांना अटक केली व दोन टेम्पो, एक दुचाकी आणि दोन ब्रास वाळू असा एकूण साडे चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला.
 
याप्रकरणातील चार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेले होते. परंतु पोलिसांनी त्यांनाही पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की, मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे, सहाय्यक फौजदार साहेबराव चव्हाण, पोलिस कर्मचारी अविराज राठोड, बालाजी नागरगोजे, होमगार्ड अल्ताफ शेख, राजकुमार बसनाळे असे सर्वजण शुक्रवारी रात्रगस्त घालीत असताना पहाटे सव्वा चारच्या सुमारास त्यांना मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावर दोन तरुण संशयास्पदरीत्या दुचाकी ( एम.एच.13,डी.एन.3116) वरून फिरत होते.
 
यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता आपले नाव श्रीशैल उंबरजे (वय 29 रा. नांदणी) व ओगसिध्द व्हनकोरे (वय 22, रा.मंद्रूप) असून आम्ही गणेश कोळी (रा.मंद्रूप) या व्यक्तीकडे 'वॉचर' म्हणून काम करतो, अशी माहिती दिली. गणेश कोळी हा भीमा नदी पात्रातील कारकल येथून अवैध वाळू उपसा करीत आहे. तसेच त्याच्याबरोबर श्रीकांत म्हेत्रे, सिराज अत्तार, कट्टप्पा काळे (रा.सर्वजण मंद्रूप) असे आम्ही सर्वजण मिळून भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करतो, अशीही माहिती दिली. कारकल येथून वाळू भरून एक टेम्पो (एम.एच.12,ए.क्‍यू.3609) तसेच दुसरा अजून एक टेम्पो येत असल्याचे सांगितले. 

यावेळी पोलिसांना माळकवठे रस्त्यावरून दोन टेम्पो भरधाव वेगाने येताना दिसले. समोर पोलिस पाहताच टेम्पो चालकांनी गाडी कच्च्या रस्त्यावरून आत नेली. तेथील गुंजाटे वस्तीवर वाळू खाली टाकून टेम्पो तिथेच सोडून पळून गेले. दोन्ही गाडीत प्रत्येकी एकप्रमाणे दोन ब्रास वाळू होती. यावेळी श्रीशैल उंबरजे व ओगसिध्द व्हनकोरे या दोघांना पोलिसांनी पहाटेच अटक केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com