#Coronavirus : दिल्लीतील कार्यक्रमात सोलापुरातील सहा जणांचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 31 मार्च 2020

सोलापूर शहरातील सहाजण दिल्लीतील कार्यक्रमाला गेले होते. या सहा जणांना प्रशासनाने शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यासाठी दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

सोलापूर : दिल्लीतील निजामुद्दीन येथील मशिदीमध्ये पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सोलापूर शहरातील सहा जणांचा सहभाग होता. सोलापूरला परत आल्यानंतर या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील नेमके किती जण दिल्लीला गेले होते, याचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू असताना दिल्लीतील निजामुद्दीन मशिदीमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडला. देश-विदेशातील जवळपास तीन हजार जणांचा यात सहभाग होता तर महाराष्ट्रातील 136 जणांचा यात सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. निजामुद्दीन मशिदीमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या रुग्णांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. सोलापूर शहरातील सहाजण दिल्लीतील कार्यक्रमाला गेले होते. या सहा जणांना प्रशासनाने शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यासाठी दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. तर ग्रामीण भागातील कितीजण दिल्लीतील कार्यक्रमाला गेले होते, याचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six people from Solapur participated in the event in Delhi