esakal | ब्रेकिंग ! शहरातील सोळा शिक्षकांनी नाकारली कोरोना ड्यूटी; पगार थांबविण्यासाठी वेतन अधिक्षकांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

2Child_Mask.jpg

'या' 16 शिक्षकांवर कारवाई
प्रमोद कुंगूलवार, विजय लोहार, रविकांत सुरवसे, सुभाष जमादार, चंद्रकांत भोसले, विनोद सावंत, रामदास खावेकर, शशिकांत मोरे, सचिन मोरे (डी. के. आसावा हायस्कूल), संजयकुमार शिवशरण, शिवानंद कटके (श्री वसंतराव नाईक हायस्कूल), अशोक हब्बू (अहिल्याबाई प्रशाला, कुमठा नाका), शिलरत्न गायकवाड (राजश्री शाहू मराठी विद्यालय), भिमराव माने, संतोष जाधव (सोनामाता कन्या हायस्कूल), शिवानंद गुदोडगी (नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल). 

ब्रेकिंग ! शहरातील सोळा शिक्षकांनी नाकारली कोरोना ड्यूटी; पगार थांबविण्यासाठी वेतन अधिक्षकांना पत्र

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या हेतूने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी महापालिका हद्दीतील शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांना कोरोना ड्यूटी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टप्प्याटप्याने शिक्षकांना किमान 30 दिवसांची ड्यूटी दिली जात आहे. मात्र, 15 ऑक्‍टोबरला आदेश काढूनही ड्यूटीवर हजर न झालेल्या 16 शिक्षकांचे वेतन थांबवावे, असे पत्र वेतन अधीक्षकांना देण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाला दिला अहवाल
15 ऑक्‍टोबरला दुसऱ्या टप्प्यात काही शिक्षकांना महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार कोरोना ड्यूटी देण्यात आली. मात्र, त्यातील 16 शिक्षकांनी अद्याप ड्यूटी जॉईन केलेली नाही. त्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर केला असून त्यांच्याकडून संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल. 
- कादर शेख, प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका

शहरातील महापालिका, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुमारे तीन हजार 200 शिक्षकांना कोरोना ड्यूटी देण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी बहूतांश शिक्षकांनी आयुक्‍तांच्या आदेशानुसार शहरातील घरोघरी जाऊन को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे केला. नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दिलेले काम त्यांनी पूर्ण केले. मात्र, काही शिक्षकांनी आयुक्‍तांचे आदेश बाजूला ठेवून गैरहजर राहणेच पसंत केले. तत्पूर्वी, कोरोना ड्यूटीवरील शिक्षकांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र दिल्याशिवाय वेतन मिळणार नाही, असेही आदेश आयुक्‍तांनी काढले आहेत. दुसरीकडे ड्यूटी नाकारणाऱ्यांना वेतन देऊच नये, असेही आयुक्‍तांनी संबंधित वेतन अधीक्षकांना सांगितले आहे. दरम्यान, वारंवार सूचना करुनही ड्यूटीवर हजर न झालेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर असमानधानक खुलासा देणाऱ्यांवर वेतन थांबविण्याची कारवाई केली जाणार आहे. तर खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधितांनी दिलेल्या कारणांची पडताळणीही केली जाणार आहे.


'या' 16 शिक्षकांवर कारवाई
प्रमोद कुंगूलवार, विजय लोहार, रविकांत सुरवसे, सुभाष जमादार, चंद्रकांत भोसले, विनोद सावंत, रामदास खावेकर, शशिकांत मोरे, सचिन मोरे (डी. के. आसावा हायस्कूल), संजयकुमार शिवशरण, शिवानंद कटके (श्री वसंतराव नाईक हायस्कूल), अशोक हब्बू (अहिल्याबाई प्रशाला, कुमठा नाका), शिलरत्न गायकवाड (राजश्री शाहू मराठी विद्यालय), भिमराव माने, संतोष जाधव (सोनामाता कन्या हायस्कूल), शिवानंद गुदोडगी (नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल).

go to top