महापुरात वाहून गेलेल्या मुंगशी येथील वृद्धाचा तब्बल 42 दिवसांनी सापडला हाडांचा सांगाडा !

Tate
Tate
Updated on

वाळूज (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नागझरी नदीला 14 ऑक्‍टोबर रोजी आलेल्या महापुरात मुंगशी (वा.) (ता. बार्शी) येथील वाहून गेलेल्या वृद्धाच्या हाडांचा सांगाडा वाळूज (ता. मोहोळ) येथील मक्‍याच्या शेतात तब्बल 42 दिवसांनी सापडला आहे. गळ्यातील तुळशीची माळ आणि अंतर्वस्त्राच्या रंगावरून मृताची ओळख पटली आहे. निवृत्ती रंगनाथ ताटे (वय 68) असे त्यांचे नाव आहे. 

याबाबत नरखेड औटपोस्ट पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश पोपळे यांनी दिलेल्या माहितीवरून, निवृत्ती रंगनाथ ताटे (मूळ गाव मानेगाव (धाकटे), ता. बार्शी) हा वृद्ध पत्नीसह मुंगशी (वा) (ता. बार्शी) येथे लेकीकडे राहात होता. नागझरी नदीकाठी त्यांची स्वतःची शेती आहे. 14 ऑक्‍टोबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. 13 व 14 ऑक्‍टोबर रोजी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नागझरी नदीला आलेल्या महापुरात ते वाहून गेले होते. याबाबत 15 ऑक्‍टोबर रोजी ते हरवल्याची तक्रार जावई बापूराव क्षीरसागर यांनी वैराग पोलिसांत दाखल केली होती. गेल्या 42 दिवसांपासून पोलिस त्यांचा शोध घेत होते; मात्र त्यांचा तपास लागला नव्हता. 

वाळूज (ता. मोहोळ) येथील कुमार दत्तात्रय कादे यांच्या भोगावती - नागझरी नद्यांच्या संगमाच्या वरील बाजूस मक्‍याच्या शेतात मशागत करण्यासाठी गेलेल्या सालगड्याला मानवी हाडांचा तुटलेला सांगाडा व कवटी दिसली. वन्य श्वापदांनी किंवा पाण्यात सडल्याने अंगावर मांस व त्वचा दिसून आली नाही. त्यांनी कुमार दत्तात्रय कादे यांना व पोलिस पाटील अर्चना कादे यांना ही घटना कळवली. त्यांनी मोहोळ पोलिसांना खबर करून मृत इसमाचे जावई बापूराव अर्जुन क्षीरसागर यांना कळवले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अंतर्वस्त्र व गळ्यातील तुळशीच्या माळेची ओळख पटवून सापडलेला सांगाडा हा आपले सासरे निवृत्ती ताटे यांचाच असल्याचे जावई बापूराव क्षीरसागर यांनी सांगितले.

या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत झाली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश पोपळे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad pawar and mla abhijit patil
Solapur Development Work Hit By Election Code Of Conduct With 1483 Crore Water Project And 1024 Crore Flyovers Delayed
Barshi Farmers Raise Water Crisis Before Devendra Fadnavis Seek Permanent Water As Drought Impacts Farming And Families
mohol police pujari trusti meeting
Marathi News Esakal
www.esakal.com