व्यवस्थेची माती; स्मार्ट सोलापुरातले नागरिक का आहेत त्रस्त

सुस्मिता वडतीले
शनिवार, 25 जानेवारी 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत सोलापूर शहराचा समावेश झाल्यानंतर अनेक प्रश्‍न सुटतील अशी आशा सोलापूरकरांना होती. मात्र, स्मार्ट सिटीत समावेश होऊन पाच वर्षे झाले तरी अद्याप शहरातील धुळीचा प्रश्‍न सुटलेला नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत धिम्या गतीने सुरू असलेली कामे हेच याचे कारण असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोलापुरातील नागरिक धुळीने हैराण झाले आहेत. अपवाद वगळता शहरात धुळीचे प्रमाण कमी-अधिक आहे. अनेक ठिकाणी रस्त्यातील खड्डे आणि रेंगाळलेली कामे हेच धुळीचे मुख्य कारण आहे. यावर उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत सोलापूर शहराचा समावेश झाल्यानंतर अनेक प्रश्‍न सुटतील अशी आशा सोलापूरकरांना होती. मात्र, स्मार्ट सिटीत समावेश होऊन पाच वर्षे झाले तरी अद्याप शहरातील धुळीचा प्रश्‍न सुटलेला नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत धिम्या गतीने सुरू असलेली कामे हेच याचे कारण असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कामासाठी खड्डे खोदले जात आहेत मात्र, वेळेत कामेच होत नसल्याने धुळीला नागरिकांना सामोर जावे लागत आहे. मंगळवार बाजार हा नेहमी गजबजलेला भाग. मात्र, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना ड्रेनेज लाइनचा सामना करावा लागला होता. आता त्यांचे धुळीशी सामना करणे सुरू आहे. जलवाहिनेच्या कामास खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणे- येणेही अवघड झाले आहे.

सिंह गाडीला आढवा आला अन्‌ पुढे काय... (व्हिडिओ

याशिवाय रस्त्यातील खड्डे ही नेहमीचीच समस्या आहे.काही ठिकाणचे रस्ते ग्रामीण भागातील रस्त्यांप्रमाणे झाले आहेत. सर्वोपच्चार रुग्णालय ते हेरिटेज दरम्यानचा रस्ता, येथूनच सात रस्त्याकडे जाणारा रस्ता याबरोबर संगमेश्‍वर महाविद्यालय परिसर सध्या धुळीच्या खाईत आहे. ही तर फक्त उदाहरणे आहेत. अन्य ठिकाणचे चित्र वेगळे आहे, असे नाही. बस स्थानक परिसर व कन्ना चौक येथे मोठ्या प्रमाणावर धूळ आहे. उन्हाळ्यात वाऱ्यामुळे धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. यातून आजारही होतात. यातून सुटका होण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे. 

महापालिकेच्या पर्यावरण कक्षकडून अपेक्षा 
महापालिकेत गेल्यावर्षी पर्यावरण कक्ष सुरू केला. या कक्षाने काम सुरू केले असून हवेचे प्रदूषण रोखण्यास त्यांनी पाऊले उचचली आहेत. याअंतर्गत शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जागृती केली जाणार आहे. याबरोबर प्रदूषण नियंत्रण महामंडळाला अहवाल देण्यात आला असून त्यात धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना केल्या आहेत. धूळ कमी करणे व त्यावरील होणाऱ्या आजारांपासून सुटका म्हणून नागरिकांना महापालिकेच्या कक्षाकडूनच अपेक्षा आहेत. 

डॉ. उमा पवार, नेत्ररोग तज्ञ : प्रत्येक नागरिकाने शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तसेच रस्त्यावरून जाताना नागरिकांनी नाकाला मास्क लावून बाहेर पडावे. तसेच सोलापूर शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडे लावावीत. शहरात झाडे लावली तर सर्वांनाच ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणावर मिळेल. 

स्वप्नील सोलनकर, पर्यावरण व्यवस्थापक : या कामाबाबत महापालिकेचा आरखडा दाखल केला असून तो मंजूर झाला आहे. सध्या शहरातील दुभाजकाच्या बाजूचे धूळ काढण्याचे काम सुरू आहे. अमृत योजनेतंर्गत फॉरेस्ट गार्डनप्रमाणे शहरातील बागा डेव्हलप करण्यासाठी प्लॅन मंजूर झाले आहेत. यासाठी सोलापुरातील नागरिकांनी मदत करावी, असे आम्ही आवाहन करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City Solapuri citizens suffer from dust