esakal | सोलापूर भाजप खासदारांवर 420 चा गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

mp solapur

या फिर्यादीनुसार सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी ऊर्फ नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ, उमरगा व अक्कलकोट तहसील कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर भाजप खासदारांवर 420 चा गुन्हा दाखल 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य केले आहे. समितीच्या सूचनेनुसार अक्कलकोटच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या न्यायालयात फिर्याद दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता खासदार महास्वामी यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी ही फिर्याद दिली आहे. 
या फिर्यादीनुसार सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी ऊर्फ नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ, उमरगा व अक्कलकोट तहसील कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल झाला आहे. 15 जानेवारी 1982 ते 24 फेब्रुवारी 2020 या दरम्यान अक्कलकोट व उमरगा तहसील कार्यालय, सोलापूरचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय या परिसरात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचे बनावट बोगस प्रमाणपत्र बनवून हे प्रमाणपत्र खोटे आहे हे माहीत असताना देखील या खोट्या प्रमाणपत्राचा दुरुपयोग करून हे प्रमाणपत्र खरे आहे असे भासविले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या खोट्या प्रमाणपत्राचा वापर करून शासकीय व आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने शासनाची फसवणूक केल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही. खासदारांसोबतच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात पुढे काय? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.