जनता मरणाच्या दारात, सरकार मात्र आपल्या घरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून  भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

सोलापूर : राज्यातील जनता मरणाच्या दारात उभी असताना  उद्धव सरकार मात्र आपल्या घरातच व्यस्त आहे. त्यामुळे आज भाजपच्या वतीने आपले घर हेच रणांगणच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. 

शहर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. सोशल डिस्टन्स इन राखत सरकारने कोरोना च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

महाभकास आघाडीचा ढिसाळपणा, चालढकलपणा, कठोर निर्णय घेण्यात अपयश, 40 हजाराकडे आगेकूच करणारी रुग्णसंख्या, मुंबईत २५ हजारांचा गाठलेला रुग्ण पल्ला, तळमळत असणारी जनता, मृतांच्या आई- बापाची वेदना, नातेवाईकांचा आक्रोश, उपचारा अभावी होणारी रुग्णांची हेळसांड, बेड्सची कमतरता, पोलिसांवरील हल्ले, पळून जाणारे रुग्ण, रुग्णांना निकृष्ट दर्जाचे अन्न, त्यात सुरू असलेला भ्रष्टाचार, पोलिस, प्रशासन आणि शासन या समन्वयाचा अभाव, मृत्यूच्या खाईत लोटला जाणारा महाराष्ट्र आणि झोपलेलं सरकार, यांना जागे करण्यासाठी  महाराष्ट्र बचाव आंदोलन  करण्यात आले.  भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या घरासमोर आंदोलन केले. 

कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून  भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur bjp news against state govt