esakal | "दुकानदार व व्यापाऱ्यांनो, मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत करू नका दुकाने उघडण्याची घाई !'

बोलून बातमी शोधा

Mini Lackdown

बिगर अत्यावश्‍यक वस्तूंच्या व्यापारी व दुकानदारांनो, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण लॉकडाउन करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हा व्यापारी व दुकानदारांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत वाट पाहावी व दुकान उघडण्याची घाई करू नये, असे आवाहन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी सर्व व्यापारी व दुकानदारांना केले आहे. 

"दुकानदार व व्यापाऱ्यांनो, मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत करू नका दुकाने उघडण्याची घाई !'
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : बिगर अत्यावश्‍यक वस्तूंचे व्यापारी व दुकानदारांनो, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण लॉकडाउन करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हा व्यापारी व दुकानदारांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत वाट पाहावी व दुकान उघडण्याची घाई करू नये, असे आवाहन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी सर्व व्यापारी व दुकानदारांना केले आहे. 

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले, की सर्व संलग्न संघटना, पदाधिकारी व व्यापारी बंधूंनो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या रविवारी (ता. 11) झालेल्या त्यांच्या टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये सर्व बाबींचा उहापोह केला. त्यानंतर मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय आज (सोमवारी) मीटिंग घेऊन महाराष्ट्र राज्यात कोव्हिड- 19 महामारीच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याबाबत राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत बिगर अत्यावश्‍यक वस्तूंच्या व्यापाऱ्यांची दुकाने उघडू नयेत, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाईचा धोका पत्करू नये, असे आवाहन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोअर कमिटीने केले आहे. 

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने, प्रशासनानेही कायद्याचा भंग करू नये, अशा स्वरूपाचे आवाहन केले आहे. या सर्व बाबींचा विचार करून आपले राज्यस्तरीय शिखर संघटनेचे (CAMIT) चेअरमन मोहन गुरुनानी, अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या निर्देशानुसार आपण सोमवारी (ता. 12) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाची वाट पाहून पुढील भूमिका घेणेच योग्य ठरेल, असे आवाहन केले आहे. 

तरी आपण मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत आपली दुकाने उघडण्याची घाई करून स्थानिक प्रशासनाकडून वरील कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाईचा धोका पत्करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच 4 एप्रिल 2021 चा सध्या मिनी लॉकडाऊन आदेश लागू आहे. त्यात अत्यावश्‍यक दुकाने व सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद असल्याने त्यात कोणताही बदल अथवा सुधारित आदेश नाहीत. या उपरांत जर कोणाला दुकान उघडायचे असेल तर व्यापारी बांधवांनी स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर दुकाने उघडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी व सचिव धवल शहा यांनी केले आहे.