शहराने ओलांडला दहा हजारांचा टप्पा ! आज 30 पॉझिटिव्ह; 31 आणि 57 वर्षीय पुरुषांचा मृत्यू

31Corona_20akola_2001_1_3.jpg
31Corona_20akola_2001_1_3.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजारांवर पोहचली आहे. दुसरीकडे मृतांच्या संख्येने साडेपाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आज 645 संशयितांमध्ये 30 पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे जुनी पोलिस लाईनमधील मुरारजी पेठेतील 31 वर्षीय पुरुषाचा तर विजयपूर रोडवरील फुरडे रेसिडेन्सीतील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी...

  • शहरातील एक लाख 10 हजार 353 संशयितांची कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार सात कोरोना पॉझिटिव्ह
  • शहरातील मृतांची संख्या 557; तर 465 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • आतापर्यंत पाच हजार 913 पुरुष, तर चार हजार 94 महिलांना झाला कोरोना
  • शहरातील पाच हजार 253 पुरुष आणि तीन हजार 731 महिलांनी केली कोरोनावर मात

शहरात आज नाखोडा सोसायटी (पुना रोड), वसंत विहार (जुना पुना नाका), सम्राट चौक, विणकर बाग (रविवार पेठ), सिध्दार्थ चौक, सिव्हिल क्‍वार्टरस, जुनी पोलिस लाईन (मुरारजी पेठ), सुंदरम नगर, कोटणीस नगर (विजयपूर रोड), विष्णुपुरी, शिवगंगा नगर, प्रसाद नगर (जुळे सोलापूर), लक्ष्मी विष्णू सोसायटी (कुमठा नाका), शिक्षक सोसायटी (दक्षिण सदर बझार), साईबाबा चौक, कुलकर्णी अपार्टमेंटजवळ (अक्‍कलकोट रोड), नवीन आरटीओ कार्यालयाजवळ, मंजुनाथ नगर (लिमयेवाडी), राजस्व नगर, एक नंबर झोपडपट्टी, उत्तर कसबा, वांगी रोड, श्री रेसिडेन्सी (सिध्देश्‍वर पेठ) आणि सोमवार पेठेत नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 102 संशयितांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले असून 41 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 26 जण होम आयसोलशेनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com