शहरात उरले आता 564 रुग्ण ! आज 20 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू  

तात्या लांडगे
Friday, 23 October 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 89 हजार 446 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 366 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज शहरात नव्या 20 रुग्णांची पडली भर; 52 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
  • एकूण रुग्णांपैकी आठ हजार 278 रुग्णांनी केली कोरोनावर मात

सोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. आतापर्यंत शहरातील एकूण टेस्टपैकी 80 हजार 80 संशयितांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, शहरातील आठ हजार 278 रुग्णांनी कोरोनावर मात करुन घर गाठले आहे. तर आता शहरातील अवघे 564 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरातील 89 हजार 446 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 366 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज शहरात नव्या 20 रुग्णांची पडली भर; 52 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
  • एकूण रुग्णांपैकी आठ हजार 278 रुग्णांनी केली कोरोनावर मात

 

शहरात आज हब्बू वस्ती (देगाव नाका), समाचार चौक (शुक्रवार पेठ), आयोध्या नगर (एसआरपीएफ कॅम्प), यशलक्ष्मी (विशाल नगर), वसंत नगर पोलिस लाईन येथे तीन, राघवेंद्र नगरात दोन (मजरेवाडी), कर्णिक नगर, अंत्रोळीकर नगर, कुमार चौक (रेल्वे लाईन), जवान नगर, रेवणसिध्देश्‍वर नगर (विजयपूर रोड), निलम नगरात तीन, होटगी रोड आणि दक्षिण सदर बझार परिसरात दोन, अशा एकूण 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

क्‍वारंटाईनमध्ये अवघे 153 संशयित 
शहरात दररोज एकूण टेस्टच्या 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यांच्या संपर्कातील संशयित व्यक्‍तींना खबरदारी म्हणून क्‍वारंटाईन केले जाते. त्यानुसार शहरातील 95 संशयितांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले असून सद्यस्थितीत 58 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 28 हजार 362 संशयितांनी होम क्‍वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The solapur city now has 564 patients left ! Today, 20 positives and two died