दुसऱ्या लाटेची भीती, पण रुग्ण कमीच ! शहरात आज 915 टेस्टमध्ये 17 पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू 

तात्या लांडगे 
Friday, 4 December 2020

कोरोनाची दुसरी लाट येईल, यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. तरीही शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करायला सुरवात केल्याने ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज 915 संशयितांमध्ये 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेचा काहीच परिणाम होणार नाही, असा विश्‍वास आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे. 

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट येईल, यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. तरीही शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करायला सुरवात केल्याने ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज 915 संशयितांमध्ये 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेचा काहीच परिणाम होणार नाही, असा विश्‍वास आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे. 

शहरात आज राजस्व नगर (विजयपूर रोड), बिलाल नगर (जुळे सोलापूर), पद्मश्री अपार्टमेंट, अवंती नगर (मुरारजी पेठ), विडी घरकूल, आयडीलएल शाळेजवळ (सबर नगर), चाटी गल्ली, जानकी नगर, बालाजी अपार्टमेंट (अशोक चौक), नरेंद्र नगर (सैफूल), चांदणी चौक (फॉरेस्ट), सहारा नगर, मडकी वस्ती (गणेश नगर), श्रध्दा एलिगन्स (बाळे), शिरालिंग नगर (विडी घरकूल) आणि दोंदे नगर (जुळे सोलापूर) याठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे आज विष्णू मिल चाळ परिसरातील 68 वर्षीय पुरुषाचा, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर) येथील 64 वर्षीय महिला आणि दाजी पेठेतील मंजुनाथ नगर येथील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 24 हजार 897 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 590 कोरोना पॉझिटिव्ह 
  • रुग्णांच्या संपर्कातील 125 संशयित होम क्‍वारंटाईन तर 59 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन 
  • आज 915 संशयितांच्या अहवालात 17 जण निघाले पॉझिटिव्ह; 38 रुग्ण झाले बरे 
  • शहरात आता उरले 398 रुग्ण; 240 पुरुष व 158 महिला रुग्णांचा समावेश 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur city only 17 people tested positive in the corona test today