शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक! टेस्टिंग मात्र 72 हजारच; आज 28 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू

तात्या लांडगे
Monday, 14 September 2020

ठळक बाबी...

  • आतापर्यंत शहरातील 72 हजार 322 संशयितांची झाली टेस्ट
  • शहरात आतापर्यंत आढळले सात हजार 528 पॉझिटिव्ह
  • शहरातील 446 रुग्णांचा झाला मृत्यू; सहा हजार 288 रुग्णांची कोरोनावर मात
  • सद्यस्थितीत शहरातील 794 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • आज 45, 46 वर्षीय महिलांचा, तर 72 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू

सोलापूर : शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक आहे. तरीही आतापर्यंत 72 हजार 322 संशयितांची कोरोना टेस्ट झाली. त्यातून 64 हजार 794 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे सात हजार 528 व्यक्‍ती पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 233 संशयितांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी 28 पॉझिटिव्ह सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कलावती नगरातील (एमआयडीसी रोड परिसर) 45 वर्षीय आणि नितीन नगरातील (अक्‍कलकोट रोड) 46 वर्षीय महिला, तर पारशी विहिरीजवळ (कुमठा नाका) 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

 

ठळक बाबी...

  • आतापर्यंत शहरातील 72 हजार 322 संशयितांची झाली टेस्ट
  • शहरात आतापर्यंत आढळले सात हजार 528 पॉझिटिव्ह
  • शहरातील 446 रुग्णांचा झाला मृत्यू; सहा हजार 288 रुग्णांची कोरोनावर मात
  • सद्यस्थितीत शहरातील 794 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • आज 45, 46 वर्षीय महिलांचा, तर 72 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू

 

सुखसागर अपार्टमेंट (उत्तर कसबा), सिव्हिल हॉस्पिटलजवळ, साखरपेठ, स्नेहल पार्क (जुळे सोलापूर), कल्याण नगर भाग- दोन, आसरा चौक, जुना एम्लॉयमेंट चौक, भाग्यश्री पार्क, एन. जी. मिल चाळ (मजेरवाडी), सिमला नगर, राजकुमार नगर (विजयपूर रोड), मंत्री चंडक नगर, शेळगी, भाग्योदय सोसायटी (नई जिंदगी), भिम नगर (सोरेगाव), जुना पुना नाका, अर्जुन कोटणीस नगर, मंगल रेसिडेन्सी, इंद्रधारा बिल्डींग (मारील चाळ), माशाळ वस्ती, सहारा नगर (होटगी रोड), विरशैव नगर, भवानी पेठ, जानकी नगर येथे नवे रुग्ण सापडले आहेत.

 

शहरातील तीनशे पुरुषांचा मृत्यू
शहरातील चार हजार 413 पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर तीन हजार 115 महिलांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी तीन हजार 642 पुरुषांनी तर दोन हजार 646 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे तीनशे पुरुष आणि 146 महिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur city Testing only 72 thousand; Today 28 positive and three died