शहराचा पाणी पुरवठा कधी होणार सुरळीत
सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी शहरवासियांना एक दिवसाआड पाण्याचे आश्वासन दिले. तरीही, दोन दिवसाआड नियमित पाणी पुरवठा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ना स्वत:चे आश्वासन पूर्ण केले, ना नागरिकांची अपेक्षा पूर्ण केली आहे. जुनाट पाईपलाईन आणि वीजेचे कारण पुढे करीत विस्कळीत पाणी पुरवठा अद्याप सुरळीत होऊ शकला नाही. चार वर्षांनंतर सत्ताधारी आता पाणी पुरवठ्याचा वेळ कमी करुन दोन- तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करु लागले आहेत. मात्र, त्यालाही मुर्त स्वरुप देता आलेले नाही. विस्कळीत पाणी पुरवठा आणि अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे गृहिणींना त्रास सहन करावा लागत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. यावर आता सत्ताधारी मार्ग काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणारी टाकळी ते सोरेगाव लाईनवर नांदणी परिसरात दोन ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊ लागली आहे. तसेच सोरेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील वॉल्वही नादूरूस्त झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. यापूर्वी वारंवार पाईपलाईनला गळती लागल्याने विस्कळीत पाणी पुरवठ्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागला आहे.
शहराचा पाणी पुरवठा कधी होणार सुरळीत
सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी शहरवासियांना एक दिवसाआड पाण्याचे आश्वासन दिले. तरीही, दोन दिवसाआड नियमित पाणी पुरवठा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ना स्वत:चे आश्वासन पूर्ण केले, ना नागरिकांची अपेक्षा पूर्ण केली आहे. जुनाट पाईपलाईन आणि वीजेचे कारण पुढे करीत विस्कळीत पाणी पुरवठा अद्याप सुरळीत होऊ शकला नाही. चार वर्षांनंतर सत्ताधारी आता पाणी पुरवठ्याचा वेळ कमी करुन दोन- तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करु लागले आहेत. मात्र, त्यालाही मुर्त स्वरुप देता आलेले नाही. विस्कळीत पाणी पुरवठा आणि अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे गृहिणींना त्रास सहन करावा लागत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. यावर आता सत्ताधारी मार्ग काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाईपलाईनला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी टाकळी येथील पंप बंद ठेवावे लागणार आहेत. गळती दुरुस्तीचे काम सोलापूर महापालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 20 ते 22 तासांचा वेळ लागणार आहे. हे काम करताना टाकळी- सोरेगावदरम्यानची मुख्य पाईपलाईन बंद ठेवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 5 जानेवारीला (मंगळवारी) शहराचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीराने व कमी वेळ केला जाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एकवेळ (एक रोटेशन) पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने केले आहे.