उपचार करा, अन्यथा हाॅस्पिटल नोंदणी रद्दची नोटीस घ्या

उपचार करा, अन्यथा हाॅस्पिटल नोंदणी रद्दची नोटीस घ्या

सोलापूर ः खाटा उपलब्ध असतानाही रुग्णालयात दाखल करुन न घेणे किंवा रुग्णास उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरुच आहे. इतके करुनही त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मग आपल्या हॅास्पिटलची नोंदणी रद्द का करू नये, अशी नोटीस बजावणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 

श्री. शिवशंकर म्हणाले, शहरातील अनेक रुग्णालयांना वारंवार विनंती केली. आठवड्याची मुदतही दिली. तरीसुद्धा रुग्णांना दाखल करून घेणे किंवा त्यांच्यावर उपचार न करणे अशी भूमिका घेतली जात आहे. अशा हॅास्पिटलचालकांना नोटीस बजावण्यात आली, तरीही हीच स्थिती कायम राहिली. त्यामुळे या रुग्णालयांविरुद्ध गुन्हे दाखल केले. एवढे करूनही या रुग्णालयातील स्थिती अशीच राहीली तर मात्र हॅास्पिटलची नोंदणी रद्द करण्याची नोटीस देणार आहे. 

कर्मचाऱ्यांना दिलासा
महापालिकेच्या अंतर्गत कँटनमेंट झोन नॉन कंटेनमेंट झोन मध्ये सर्व्हे करत असलेल्या सर्व  नर्सेस आणि आशा वर्कर  तसेच इतर कर्मचारी त्याच्या  सुरक्षितेसाठी  पी.पी.ई किट आणि मास्क,हँड ग्लोज,फेस मास्क हे देउनच काम सुरू करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. तसेच सर्व्हे करत असलेल्या ठिकाणी काही वस्तू  कमी पडत असेल तर आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात  येईल, असे आयुक्तांनी सांगितले. सर्वांना किट मिळाल्यानंतरच सर्व्हे करण्यात यावे असेही ते म्हणाले. 

सर्व्हे करत असलेल्या नर्स व विद्यार्थिनींना  येण्या-जाण्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने त्यांची सोय वाडिया हॉस्पिटल येथे करण्यात येणार असून तसेच ज्या नर्सेस हे लांब राहतात त्या नर्सला त्या भागातील कंटेनमेंट झोन मध्येच काम देण्याचा विचार करण्यात येईल. जे कर्मचारी सर्व्हेक्षण करत आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या विमा लागू करण्यात येईल आणि जे चौदा दिवस या सर्व्हे मध्ये काम केलेले आहेत अशाना ही  50 लाखाचा विमा लागू राहणार आहे तसेच सर्व्हे करत असताना कर्मचारी हे आजारी पडले तर महापालिकेचे मार्फत उपचार करण्यात येईल , असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com