सोलापुरात सापडले आणखीन दहा कोरोना बाधित,  एकूण संख्या 124

सोलापुरात सापडले आणखीन दहा कोरोना बाधित,  एकूण संख्या 124
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात आज नवीन दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित  रुग्णांची संख्या 124 झाली असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. 


मंत्री जयंत पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या उपाय योजनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले,  सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत ही चांगली बाब आहे. सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांनाचा वाढणारा वेग हा कमी कसा करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कोरोना चाचणीसाठी  स्वॅब  घेण्यापूर्वी काही उपाययोजना करता येतात का?  ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील. याबाबतही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com