सोलापुरात दोन मृत्यूसह पाच पॅाझिटीव्ह, एकूण पॅाझिटीव्ह 461

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 20 मे 2020

आतापर्यंत एकूण 4277 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 4238 निगेटीव्ह आले आहेत, तर 461 पॅाझिटीव्ह आले आहेेत. आतापर्यंत 165 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. 

सोलापूर - जिल्हा प्रशासनाने आज बुधवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सोलापुरात कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला तर पाच रुग्णांचे अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 32 झाली आहे. 

आज पॅाझिटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. बुुधवारी सकाळपर्यंत 126 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 121 अहवाल निगेटीव्ह आले, तर पाच पॅाझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 4277 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 4238 निगेटीव्ह आले आहेत, तर 461 पॅाझिटीव्ह आले आहेेत. आतापर्यंत 165 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona news