सोलापूर शहरात सात मृत्यूसह 53 पॅाझिटीव्ह ; एकूण पॅाझिटीव्ह 1160

सोलापूर शहरात सात मृत्यूसह 53 पॅाझिटीव्ह ; एकूण  पॅाझिटीव्ह 1160
Updated on

सोलापूर - महापालिकेने आज शनिवारी रात्री साडेदहा वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीत सातजणांच्या मृत्यूसह तब्बल 53 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

आज प्राप्त झालेले अहवाल ः 290
निगेटीव्ह अहवाल ः 237
पॅाझीटीव्ह अहवाल ः 53
बरे होऊन परतलेले रुग्ण ः 74
मरण पावलेल्यांची संख्या -07

सोलापूर कारागृह, सिद्धेश्वरनगर, आंबेडकरनगर, बुधवार पेठ, वडार गल्ली, भवानी पेठ, आदर्शनगर, निर्मिती विहार, विजापूर रस्ता, इंदिरानगर, इंदिरा वसाहत, भवानी पेठ, नीलमनगर, सत्तरफूट रस्ता, महेशनगर, माधवनगर, वारदफार्म, न्यू सुनीलनगर, एमआयडीसी रस्ता, शुक्रवार पेठ, सुनीलनगर, मड्डीवस्ती, विद्यानगर, न्यू आरटीअो सोलापूर, यशवंत हाऊसिंग सोसायटी, कुमठानाका, शिवगंगानगर कुमार हॅाल, रेल्वेलाईन्स, भीमाशंकरनगर, विजापूरनाका, नई जिंदगी, विद्यानगरशेळगी, न्यू बुधवार पेठ, केशवनगर, विजयालक्ष्मी चौक, न्यू पाच्छा पेठ, रेल्वे लाईन्स फाॅरेस्ट, बुधवार पेठ, सम्राट चौक या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. 

आधीचे वृत्त (ग्रामीण)
ग्रामीण भागात तीन नवीन रुग्ण 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिका क्षेत्र वगळून) आज नवीन तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नवीन तिन्ही रुग्ण हे पुरुष आहेत. कोरोना चाचण्यांचे 28 रिपोर्ट आज सायंकाळी पाचपर्यंत प्राप्त झाले असून त्यापैकी  25 निगेटिव्ह तर  तीन पॉझिटिव्ह आले आहेत. 
कोरोनामुक्त झालेल्या एका पुरुषाला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज नव्याने आढळलेल्या तीन कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये दक्षिण  सोलापूर तालुक्‍यातील मंद्रूप येथील पोलिस लाइनमधील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकुल येथील एक पुरुष आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कवठा तांडा येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 73 झाली आहे. सहा व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला असून सहा व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. उर्वरित 61 व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 32 कोरोना चाचणी रिपोर्ट प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 73 रुग्णांमध्ये अक्कलकोट तालुक्‍यात आठ, बार्शी तालुक्‍यात 18, माढा तालुक्‍यात एक, माळशिरसमध्ये दोन, मोहोळमध्ये चार, उत्तर सोलापूरमध्ये दोन, पंढरपूरमध्ये सात, सांगोल्यातील तीन, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 28 असे एकूण 73 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. करमाळा व मंगळवेढा या दोन तालुक्‍यांत अद्यापही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

आधीचे वृत्त (महापालिका क्षेत्र)
कारागृहातील 17 जणांसह 30 बाधित 
महापालिका हद्दीत शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कोरोनाचे 30 बाधित रुग्ण आढळले. जिल्हा कारागृहातील 17 जणांचा त्यात समावेश आहे. 
त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या एक हजार 107 पर्यंत पोचली आहे. या कालावधीत एकही मृत्यू नाही. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत एकूण 152 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 122 जणांचे अहवाल बाधित नसल्याचे आले, तर 30 जणांचे अहवाल बाधित आले. बाधित अहवालात 17 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार संगमेश्‍वरनगर, सोलापूर कारागृह, एकतानगर, निवासी डॉक्‍टर वसाहत, विनायकनगर, शुक्रवार पेठ, लोधी गल्ली,
 सिद्धेश्‍वर हाउसिंग सोसायटी, हनुमाननगर, सिद्धेश्‍वरनगर नई जिंदगी आणि 70 फूट येथील रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत एक हजार 107  बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात 647 पुरुष तर 460 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 94 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 446 बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर 567 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत गेले आहेत. कोरोनावर मात करून परतलेल्या रुग्णांत कोरोनाची लागण झालेले महापालिकेतील पहिले  अधिकारी, तसेच एका नगरसेविकेच्या कुटुंबातील सातजणांचा समावेश आहे. याशिवाय शहराच्या विविध भागातील रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. महापालिकेतील काही उच्चपदस्थ पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांवर रेल्वे रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध करण्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. काल शुक्रवारी सकाळी एकत्रित अहवाल प्रसिद्ध झाला, त्यावेळी एकूण बाधित रुग्णांची संख्या एक हजार 144 झाली. 
शनिवारी सकाळी फक्त महापालिका क्षेत्रातील अहवाल सादर झाला. तेव्हा महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या एक हजार 107 झाली होती. 
त्यामुळे अनेक नागरिकांनी काल एक हजार 144 असताना आता एक हजार 107 कसे झाले, अशी विचारणा केली. स्वतंत्र अहवालाने नागरिकांत 
संभ्रम निर्माण झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com