सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रावर आता सीसी टीव्हीची नजर

सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रावर आता सीसी टीव्हीची नजर

सोलापूर - कोरोना रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या सोलापूर शहरातील कंटेनमेंट झोनवर आता सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. रविवारी शास्त्रीनगर आणि भारतरत्न इंदिरानगर परिसरात सीसी टीव्ही लावण्यात आले. 

कंटेंनमेंट झोन वाढू लागल्याने महापालिका प्रशासानाच्या यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. अशावेळी सीसी टीव्हीच्या माध्यमातून संबंधित परिसरावर सीसी टीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. 

ज्या भागात जादा रुग्ण आढळून आले आहेत त्या भागातील नागरिकांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. शास्त्रीनगरनंतर इंदिरा गांधीनगर आणि त्यानंतर उर्वरीत कंटेनमेंट झोनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. 

वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी शासकीय रुग्णालयासमोरील आयडी हॅास्पीटलमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्याएेवजी प्रमाणपत्र आवश्यक असणाऱ्यांनी महापालिकेने सोय केलेल्या इतर केंद्रातूनही प्रमाणपत्र घेण्यासाठी जावे. त्यामुळे त्यांना लवकर प्रमाणपत्र मिळेल. महापालिकेने 13 ठिकाणी प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे. आतापर्यंत 23 हजार 827 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. प्रवासासाठी त्यांना पास देण्यात आल्याचे आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. 

शहरातून जाणाऱ्या नागरिकांची संख्या पहाता आणखी तीन हॅास्पिटलमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, महापौर श्रीकांचना यन्नम व श्री. तावरे यांनी रविवारी काही कंटेनमेंट झोन मध्ये जाऊन पाहणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com