सोलापुरात रविवारी पाच नवे कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 570

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

सोलापूर जिल्हा प्रशासनाने रविवारी सकाळी कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल सादर केला. त्यानुसार सोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणखीन वाढली आहे. 

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने आज रविवारी सकाळी प्रसिद्ध केल्यानुसार गेल्या बारा तासांत सोलापुरात पाच कोरोनाबाधित रुग्ण वाढले. बाधित रुग्णांमध्ये चार पुरुष आणि एक स्त्रीचा समावेश आहे. 

गेल्या बारा तासात एकूण.77 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच अहवाल पॅाझिटीव्ह, तर 72 निगेटीव्ह आले. त्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत 5500 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 570 इतके पाॅझिटीव्ह तर 4930 इतके निगेटीव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 46 रुग्ण मरण पावले आहेत, तर 249 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत घरी गेले आहेत. सोलापुरात पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे, त्याप्रमाणे बरे होऊन परतणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona news on sunday