सोलापुरातील कॅांग्रेस नेत्याच्या मुलाला कोरोना

सोलापुरातील कॅांग्रेस  नेत्याच्या मुलाला कोरोना

सोलापूर - येथील कॅांग्रेस  नेत्याच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे. शासकीय महाविद्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या यादीमध्ये या नेत्याच्या मुलाचा समावेश आहे. 

या शिवाय प्रियदर्शनी सोसायटी, उत्तर कसबा, जिल्हा कारागृह, कुमठा नाका, अवंती नगर आणि कविता नगर पोलिस लाईन येथील रहिवासी असलेल्या रुग्णांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांवर शासकीय रुग्णालय, विमा रुग्णालय आणि कुंभारी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

डफरीन हॅास्पिटलमध्ये कोविड कंट्रोल रूम 
सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून सोलापूर महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने डफारिन हॉस्पिटल येथे कोव्हिडं-- 19 कंट्रोल रूम उभारण्यात आले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या ठिकाणीची पाहाणी करून महिती जाणुन घेतली .यावेळी नगररचना  लक्ष्मण चलवादी,प्रसाशन अधिकारी कादर शेख,डॉ.जयंती आडके ,सिद्धेश्वर बोरगे आदी मान्यवर उपस्थित. कोव्हिडं19 कंट्रोल रूम मधून सोलापूर शहरातील विविध  कंनटेमेंट झोन मधील परिस्थितीची महिती तसेच तेथील व्यवस्था,कोरोना बाधित नागरिकांची  सम्पूर्ण  माहिती संकलित करणे आणि शासनाकडे पटवून देणे.शहरातील विविध हॉस्पिटल मधील कोव्हिडं 19 चे पेंशट माहिती संकलित करणे.त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करणे . तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना बद्दल महापौर श्रीकांचना यन्नम यांनी माहिती घेतली.

सोलापूर  कोरोना आजचा अहवाल
आजचे तपासणी अहवाल - 128
पॉझिटिव्ह- 29                             

निगेटिव्ह- 99
आजची मृत संख्या- 1 स्त्री
एकूण पॉझिटिव्ह- 653
एकूण निगेटिव्ह - 5365
एकूण चाचणी- 6018
एकूण मृत्यू- 64
एकूण बरे रूग्ण- 279
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com