ज्येष्ठ वकील, गिरणी कामगारासह सोलापुरात तिघांचा मृत्यू 

ज्येष्ठ वकील, गिरणी कामगारासह सोलापुरात तिघांचा मृत्यू 

सोलापूर : कोरोनाची बाधा झाल्याने एक ज्येष्ठ वकील व गिरणी कामगारासह तिघांचा बुधवारी सोलापुरात मृत्यू झाला. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आज दिवसभरात महापालिका हद्दीत 42 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार 310 वर पोचली आहे. 


मरण पावलेले वकील 89 वर्षांचे होते. स्वप्नपूर्ती सर्वोदय हौसिंग सोसायटी परिसरातील घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्‍यास मार लागला. त्यांनी खासगी डॉक्‍टरकडे उपचार घेतले, पण बरे न वाटल्याने त्यांना अश्‍विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा एक्‍स-रे काढला असता, त्यांना न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट झाले. भारतरत्न इंदिरानगर येथील गिरणी कामगार 63 वर्षांचे होते. त्यांची यापूर्वी ऍन्जिओग्राफी झाली होती. त्यांच्यावर अश्‍विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. रामराज्यनगर शेळगी येथील महिला 67 वर्षांची होती. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे यापूर्वी तीन वेळेला डायलिसिस करण्यात आले होते. या तिघांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 


महापालिकेतील कर्मचारी तथा कामगार नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आज आणखी एका कामगार नेत्याची भर पडली. कोरोनाची लागण झालेले एक नगरसेवक, एक नगरसेविका, नगरसेविकेचे पती व त्यांचे कुटुंबीय सध्या कोरोनामुक्त झाले आहेत. उच्चपदस्थ पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांवर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खासगी आणि रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असून, त्यांनाही घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


बुधवारी 362 अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 320 अहवाल निगेटिव्ह आले, तर 42 अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 49 जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आज तीन जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये अश्‍विनी रुग्णालयात दोन, तर गंगामाई रुग्णालयात एक मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण आठ हजार 400 व्यक्तींच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ हजार 279 जणांचा अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालापैकी सहा हजार 969 अहवाल निगेटिव्ह, तर एक हजार 310 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 121 अहवाल प्रलंबित आहेत. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com