#Solapur : बापरे.. संचारबंदीत पोलिसाच्या जीपमध्ये ओली पार्टी! 

#Solapur : बापरे.. संचारबंदीत पोलिसाच्या जीपमध्ये ओली पार्टी! 

सोलापूर : संचारबंदीचा कालावधी पोलिसाच्या जीपमध्ये बसून बिअर पित, बिर्याणी खात पार्टी केल्याचे प्रकरण सोमवारी सोलापुरात घडले. या घटनेनंतर शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

गांधीनगर परिसरात सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या केतन कसबे या संशयित तरुणाने सोमवारी पोलिसाच्या जीपमधून फिरत विविध ठिकाणी फेसबुक लाईव्ह केले. बिर्याणी खात, बिअर पित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संशयित केतन हा कोणत्या पोलिसाच्या वाहनात बसला होता? याबाबत चौकशी सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा हे प्रकरण गुन्हे शाखेकडे पोचले. त्यानंतर तपासाला गती देण्यात आली. मंगळवारी दुपारपर्यंत या प्रकरणात दोघ संशयितांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. संशयीत चेतन याने हा प्रकार कोठे आणि कसा केला याबाबतची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com