सोलापूर जिल्ह्यातील 37 टक्के पंचनामे पूर्ण, करमाळा तालुका अव्वल 

प्रमोद बोडके
Friday, 23 October 2020

तीन लाख शेतकऱ्यांना फटका 
अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 32 हजार 557 शेतकरी बाधित झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 144 गावांना अतिवृष्टी व महापूराचा फटका बसला आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नूकसानीच्या पंचनाम्याचे काम प्रशासनाच्यावतीने युध्द पातळीवर हाती घेण्यात आले आहे. आज अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एकूण बाधित 2 लाख 29 हजार 661 हेक्‍टर पैकी 85 हजार 319 हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्राच्या 37.15 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील अद्यापही 1 लाख 44 हजार 341 हेक्‍टरवरील नूकसानीचे पंचनामे बाकी आहेत. पंचनामे पूर्ण करण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका अव्वल राहिला आहे. सर्वाधिक 85.96 टक्के काम या तालुक्‍यात झाले आहे. सर्वात कमी फक्त 14 टक्के काम सांगोला तालुक्‍यात झाले आहे. करमाळ्यानंतर बार्शी तालुक्‍यातही पंचनाम्याचे काम जलद होत आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 46.12 टक्के, बार्शी तालुक्‍यातील 79.21 टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 24.88 टक्के, मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावांमधील 19.44 टक्के, अक्कलकोट तालुक्‍यातील 30.30 टक्के, माढा तालुक्‍यातील 28.39 टक्के, करमाळा तालुक्‍यातील 85.96 टक्के, पंढरपूर तालुक्‍यातील 33.48 टक्के, मोहोळ तालुक्‍यातील 28.96 टक्के, मंगळवेढा तालुक्‍यातील 25.27 टक्के, सांगोला तालुक्‍यातील 14.24 टक्के आणि माळशिरस तालुक्‍यात 43. 64 टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur district, 37 per cent panchnama has been completed, Karmala taluka tops