
सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतींसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी 50.16 टक्के मतदान झाले आहे. सांगोला तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत सर्वाधिक 54.73 टक्के तर मोहोळ तालुक्यात सर्वांत कमी 40.69 टक्के मतदान झाले आहे.
माळीनगर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतींसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी 50.16 टक्के मतदान झाले आहे. सांगोला तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत सर्वाधिक 54.73 टक्के तर मोहोळ तालुक्यात सर्वांत कमी 40.69 टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील 642 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील 642 ग्रामपंचायतींसाठी सहा लाख 20 हजार 223 स्त्री, सहा लाख 63 हजार 196 पुरुष व इतर 17 असे मिळून एकूण 12 लाख 86 हजार 431 मतदार आहेत. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 12.54 टक्के मतदान झाले होते. या पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ असल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र, दुसऱ्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात 32.52 टक्के मतदान झाले होते. प्रत्येक पुढच्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. करमाळा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात सरासरी 52 टक्क्यांचा मतदानाचा टप्पा पार केला आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यातील तीन लाख 18 हजार 58 स्त्री, तीन लाख 27 हजार 262 पुरुष व इतर दोन अशा एकूण सहा लाख 45 हजार 322 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
दुपारी दीड वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी : करमाळा 52.17, माढा 50.84, बार्शी 49.90, उत्तर सोलापूर 52.12, मोहोळ 40.69, पंढरपूर 51.65, माळशिरस 46.70, सांगोला 54.73, मंगळवेढा 51.39, दक्षिण सोलापूर 52.14, अक्कलकोट 51.19.
संपादन : श्रीनिवास दुध्याल