
सोलापूर : दुष्काळी सोलापूर जिल्हा, सर्वाधिक साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा यामध्ये अनेकदा राज्यातील आणि केंद्रातील अधिकाऱ्यांचा गोंधळ उडतो. सोलापूर जिल्ह्यात यंदा वरुणराजा जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत म्हणजे संपूर्ण पावसाळा धो-धो बरसल्याने यंदा जिल्ह्यात सरासरीच्या 115 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी 481.1 मिली मिटर असून यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळा कालावधीत 554.5 मिली मिटर पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या नदी, नाले, तलाव तुंडूंब भरल्याने बळिराजा सुखावला आहे.
द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, खरबूज यासह तरकारीची पिकं हातातोंडाशी आली असताना कोरोनाचे संकट धडकले. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन पुकारला आणि बळिराजाने जपलेल्या सोन्यासारख्या पिकांचा भाव गडगडला. बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, खरबूज मातीमोल दराने विकले. कोरोनाच्या संकटाने धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या मनावरील निराशेचे मळभ मात्र यंदाच्या पावसाने पुरते धुवून टाकले आहे. यंदा सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. सप्टेंबरपर्यंत पावसाने यंदा साथ दिल्याने खरिपाची पिके सध्या जोमात आहेत.
असा झाला यावर्षी पाऊस
तालुका सरासरी पाऊस यंदा झालेला पाऊस यंदाच्या पावसाची टक्केवारी
उत्तर सोलापूर 552 461.5 83.6
दक्षिण सोलापूर 536.4 437.3 81.5
बार्शी 528.1 664.6 125.8
अक्कलकोट 543.4 547.3 100.7
मोहोळ 457.4 520.1 113.5
माढा 475.1 539.2 113.5
करमाळा 457.6 500.00 109.3
पंढरपूर 489 569.4 116.4
सांगोला 468.3 531.0 113.4
माळशिरस 427.4 669.2 156.6
मंगळवेढा 434.0 563.6 129.9
एकूण 481.1 554.5 115.3
गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वरुणराजा धो-धो बरसला
सोलापूर जिल्ह्यात 2011 मध्ये 411.7 मिली मिटर, 2012 मध्ये 306.7, 2013 मध्ये 500.9, 2014 मध्ये 356.6, 2015 मध्ये 193.9, 2016 मध्ये 395.3, 2017 मध्ये 415.3, 2018 मध्ये 240.2, 2019 मध्ये 330.9, 2020 मध्ये 554.5 मिली मिटर पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर कालवाधीत यंदा सर्वाधिक पाऊस झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.