esakal | सोलापुरातून 530 प्रवासी घेऊन सोलापूर- मुंबई- सोलापूर रेल्वे मुंबईला पोहचली 
sakal

बोलून बातमी शोधा

0indian_railway66666_0.jpg

ठळक बाबी.... 

  • रेल्वे मंत्राल्याच्या आदेशानुसार मुंबई मुख्यालयाने विशेष रेल्वे सुरु करण्यास दिली परवानगी 
  • सोलापूर- मुंबई- सोलापूर सुपरफास्ट विशेष रेल्वे शुक्रवारपासून (ता. 9) सुरु झाली 
  • सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करीत 530 प्रवाशांनी केला विशेष रेल्वेतून प्रवास 
  • मुंबईहून रात्री 10.40 वाजता निघणारी ही विशेष रेल्वे सोलापुरात साडेसहाच्या सुमारास पोहचणार 
  • प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात सुरु होईल सोलापुरातून दुसरी विशेष रेल्वे 

सोलापुरातून 530 प्रवासी घेऊन सोलापूर- मुंबई- सोलापूर रेल्वे मुंबईला पोहचली 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउनवेळी गावी आलेल्यांना तथा लॉकडाउनमध्ये सोलापुरकडे येऊ न शकलेल्या प्रवाशांसाठी केंद्रीय रेल्वे बोर्डाने सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेसच्या धर्तीवर सोलापूर- मुंबई- सोलापूर ही विशेष रेल्वे सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी (ता. 9) ही रेल्वे 530 प्रवाशांना घेऊन रात्री पावणेअकराच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

ठळक बाबी.... 

  • रेल्वे मंत्राल्याच्या आदेशानुसार मुंबई मुख्यालयाने विशेष रेल्वे सुरु करण्यास दिली परवानगी 
  • सोलापूर- मुंबई- सोलापूर सुपरफास्ट विशेष रेल्वे शुक्रवारपासून (ता. 9) सुरु झाली 
  • सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करीत 530 प्रवाशांनी केला विशेष रेल्वेतून प्रवास 
  • मुंबईहून रात्री 10.40 वाजता निघणारी ही विशेष रेल्वे सोलापुरात साडेसहाच्या सुमारास पोहचणार 
  • प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात सुरु होईल सोलापुरातून दुसरी विशेष रेल्वे 

कोरोनाच्या महामारीवर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चपासून देशभर लॉकडाउन जाहीर केला. त्यानंतर टप्प्याटप्याने रेल्वे, बससह अन्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टप्याटप्याने अनलॉक केले जात असून जनजीवन पूवर्वत होऊ लागले आहे. प्रारंभी बंद असलेली शासकीय व खासगी कार्यालयांचे कामकाज आता सुरु झाले आहे. जिल्हाबंदी उठल्यानंतर आंतरजिल्हा वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या रेल्वे गाड्यांमधील काही रेल्वे विशेष रेल्वे म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर ते मुंबई ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांना स्थानकांवरुन रांगेत उभारुन तिकीट देणे बंदच आहे. आरक्षण केंद्रांवरुन तथा ऑनलाइन पध्दतीने प्रवासी तिकीट घेऊ शकतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, रेल्वे स्थानकांवर येताना नातेवाईकांनी येऊ नये, सर्व प्रवाशांना थर्मल स्क्रिनिंग करुनच गाडीत प्रवेश दिला जात आहे, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.