ब्रेकिंग! नगरसेवक कामाठीची बायकोही झाली पसार अन्‌ आता...

तात्या लांडगे
Tuesday, 8 September 2020

...तर कामाठीच्या मालकत्तेवर टाच
मटका बुकीवर कारवाई करताना एका व्यक्‍तीचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अवैध व्यवसायात भागिदारी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फही करण्यात आले. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने पोलिसांनी याचा सखोल तपास सुरु केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाठीने पोलिसांत हजर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आगामी काही दिवसांत कामाठी स्वत:हून हजर न झाल्यास त्याची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. तत्पूर्वी, तपासाची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर : मटका बुकी प्रकरणात पोलिसांना वॉन्टेड असलेला नगरसेवक सुनिल कामाठी गुन्हा घडलेल्या दिवसांपासून पसार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी कामाठीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याची बायको व आकाश कामाठी याच्या आईला चौकशीसाठी बोलावले होते. प्राथमिक चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावून पोलिसांनी दोघींनाही सोडून दिले. मात्र, त्याच रात्री दोघीही घराला कुलूप लावून पसार झाल्याचे समोर आले आहे.

अशोक चौकातील एका इमारतीत कामाठीचा मटका बुकीचा व्यवसाय जोमात सुरु होता. त्यामध्ये जेलरोड पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी स्टिफन स्वामी याचीही भागिदारी असल्याने त्याला पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइलसह मटका संदर्भातील साहित्य जप्त केले आहे. आता पोलिसांना त्याआधारे सखोल चौकशी सुरु केली आहे. दुसरीकडे कामाठीचा तपास सुरु असून त्याचा मोबाइल बंद असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी, कामाठी यांच्या पत्नी व आकाश कामाठी यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी समाधान न झाल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. मात्र, त्या सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात न आल्याने त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली. परंतु, त्या दोघीही रात्रीच घर लावून पसार झाल्या होत्या, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामाठी हजर न झाल्यास ठोस कारवाई
मटका बुकीचा अवैध व्यवसायप्रकरणी नगरसेवक सुनिल कामाठीसह अन्य संशयित आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा घडलेल्या दिवसांपासून कामाठी पसार झाला आहे. त्याचा शोध सुरु असून तो पोलिसांत हजर न झाल्यास त्यापुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन करण्यात आले आहे. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्‍त, सोलापूर

...तर कामाठीच्या मालकत्तेवर टाच
मटका बुकीवर कारवाई करताना एका व्यक्‍तीचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अवैध व्यवसायात भागिदारी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फही करण्यात आले. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने पोलिसांनी याचा सखोल तपास सुरु केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाठीने पोलिसांत हजर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आगामी काही दिवसांत कामाठी स्वत:हून हजर न झाल्यास त्याची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. तत्पूर्वी, तपासाची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur municipal corporation Corporater sunil Kamathis wife passed the house at night