"या' महापालिकेच्या तिजोरीला विद्युत दाहिनीचा आधार 

"या' महापालिकेच्या तिजोरीला विद्युत दाहिनीचा आधार 
Updated on


सोलापूर : महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी प्रत्येक महिन्यांत मिळकत कर, भूमी व मालमत्ता, स्थानिक संस्था कर या विभागाची मोठी मदत असते. मात्र या खात्यांचे उत्पन्न शून्य मिळाल्याने एप्रिल महिन्यांत मात्र चक्क विद्युतदाहिनी आणि आरोग्य विभागामुळे महापालिकेच्या तिजोरीला आधार मिळाला आहे. कोरोना विषाणुमुळे अंत्यविधीसाठी मोरे स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा वापर वाढल्याने एका महिन्यात तब्बल 24 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. एका महिन्यात आतापर्यंत विद्युत दाहिनीपासून इतके उत्पन्न कधीही मिळाले नव्हते. एका अंत्यविधीसाठी 300 रुपये आकारले जातात, मिळालेले उत्पन्न पाहता एप्रिलमध्ये 80 जणांचा अंत्यविधी विद्युत दाहिनीवर करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या विभागाकडून शून्य उत्पन्न
आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यांत म्हणजे एप्रिल महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडते. कोरोनामुळे यंदा ही तिजोरी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिकामीच राहिली असून, आरोग्य विभाग आणि विद्युत दाहिनीमुळे महापालिकेच्या तिजोरीत काही तरी "जमा' झाले आहे. महत्त्वाच्या विभागाकडून शून्य उत्पन्न मिळाले आहे. चार विभागांचे उत्पन्न मिळाल्यामुळे पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत फक्त 2 लाख 41 हजार 107 रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातील हे सर्वाधिक कमी उत्पन्नाचा विक्रम आहे. 

तिजोरीत फक्त 2 लाख 41 हजार 107 रुपये
महापालिकेस एकूण 17 विभागाकडून उत्पन्न मिळते. त्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न हे मिळकत कर, गलिच्छ वस्ती सुधारणा, हद्दवाढ, भूमी व मालमत्ता, मंडई, उद्यान, स्मृती मंदीर, अभिलेखापाल या विभागाकडून मिळते. मात्र एप्रिल महिन्यांत 17 पैकी 13 विभागाकडून शून्य रुपये उत्पन्न मिळाले आहे. यंदा महापालिकेची तिजोरी दोन लाखांने भरण्यासाठी आरोग्य विभाग, नगरअभियंता (विद्युत दाहिनी) आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता या विभागाची मदत झाली आहे. 

रुग्णांची संख्या वाढली
इतर वेळी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या तितकी नसते. त्यामुळे आरोग्य विभागाचे दर महिन्याला मिळणारे सरासरी उत्पन्न 35 ते 40 हजार रुपये असते. मात्र सध्या कोरोनामुळे शहरातील खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे महापालिका दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या दवाखान्यात औषध व गोळ्या मोफतच दिल्या जातात. फक्त केसपेपर काढण्यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाते. एप्रिल महिन्यात महापालिका दवाखान्यांत उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आरोग्य विभागाकडून यंदा पहिल्यांदाच तब्बल 1 लाख 66 हजार 336 रुपये उत्पन्न मिळाले आहे. आरोग्य विभाग आणि विद्युत दाहिनीमुळे एप्रिल महिन्यात किमान दोन लाख रुपये उत्पन्नाचा टप्पा महापालिकेस ओलांडता आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com