...तर गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवू

हुकूम मुलाणी
गुरुवार, 25 जून 2020

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना पडीक उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी भान ठेवून बोलावे. त्यांची भाषा अशीच राहिली तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांनी दिला.

मंगळवेढा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना पडीक उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी भान ठेवून बोलावे. त्यांची भाषा अशीच राहिली तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांनी दिला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना बेताल व्यक्त केले. त्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.  त्या वक्तव्याचा समाचार घेताना जिल्हाध्यक्षा नागणे म्हणाल्या, जी व्यक्ती राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात उभारल्यानंतर सर्वात जास्त मताने पराभूत होऊन आपलं डिपॉझिट वाचू शकली नाही. त्यांना पवारांवर बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्या नगरीतून त्यांनी पवारावर 
आधी त्यांनी ज्या संतनगरीत येऊन पवार यांच्यावर आरोप केले. त्याच ठिकाणी येवून त्यांनी आधी आत्मक्लेष करावा. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यांचे योगदान किती आहे. हे देखील त्यांनी तपासावे मग पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर आरोप करावेत. पवारांवरील आरोप राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी कधीच खपवून घेणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur NCP District President Anita Nagne criticizes Padalkar