मी देव आहे...मी देव आहे म्हणणारे खासदार कुठे आहेत.. (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 22 मे 2020

हे आंदोलन कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने नव्हे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या सांगण्यावरून केले जात असल्याचेही श्री. बरडे म्हणाले.  

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतःला देव म्हणवून घेणारे व सातत्याने मी देव आहे...मी देव आहे म्हणणारे सोलापुरचे खासदार कुठे गेले असा प्रश्न शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांनी आज येथे उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने आयोजिलेल्या काळे झेंडे दाखवून घरासमोर आंदोलन करण्याच्या विरोधात शिवसेनेने आयोजिलेल्या आंदोलनाप्रसंगी श्री. बरडे बोलत होते. 

श्री. बरडे यांच्यासह यावेळी प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, आशुतोष बरडे, सुरेश जगताप, समर्थप्रसाद बरडे, अमर चौगुले, नरेश चव्हाण, रवींद्र कारंजे, सचिन पाटील, रितेश कल्याणशेट्टी, मंगेश क्षीरसागर, राज पांढरे, संदीप भोसले, दत्ता देशमुख, अजय अमनूर, संभाजी कोडगे, लक्ष्मण शिंदे, आकाश भगरे, संजय गवळी व कार्यकर्ते उपस्थित होते. घोषणाबाजी करताना सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला. यावेळी भाजपच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने नव्हे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या सांगण्यावरून केले जात असल्याचेही श्री. बरडे म्हणाले.  

आज सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे. अशावेळी महापालिकेतील पदाधिकारी महापौर, उपमहापौर, भाजपचे खासदार आणि आमदार गायब झाले आहेत. वास्तविक अशावेळी राजकारण करण्याची गरज नाही. महामारीच्या वेळी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असताना भाजपने हे आंदोलन केले आहे. राज्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, असेही श्री. बरडे म्हणाले. 

मी देव...मी देव म्हणणारे खासदार कुठे आहेत.. (VIDEO)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news