कोरोना : उत्तर सोलापूर तालुक्‍यात प्रशासनाकडून गांभीर्य नाही 

दयानंद कुंभार
मंगळवार, 24 मार्च 2020

ग्रामसेविका दीड महिन्यात दोन ते तीन वेळाच गावात हजर होत्या. सध्या कोरोनो आजारामुळे सर्व ग्रामसेवकांना संबंधित गावात मुख्यालयात हजर राहून नागरिकांना आरोग्य बाबत काळजी घेण्याबाबत सुचना करण्याऐवजी ग्रामसेवकांचा कारभार घरात बसुन चालत आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला किती गांभीर्य आहे हे यावरुन स्पष्ट झाले आहे. 

वडाळा (सोलापूर) : कोरोनो विषाणुने राज्यात थैमान घातल्याने भिवंडी, पुणे, मुंबईत उदरनिर्वाहानिमित्त व नोकरीनिमित्त आसलेले नागरिकांनी आपआपल्या मुळ गावी धाव घेतली आहे. सध्या रानमसलेत 22 मार्चला 18 तर 23 मार्चला 26 जण दाखल झाले आहेत. असे अनेक नागरिक येऊन गांवात ठिय्या मांडला आहे. कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता फक्त आशावर्कर मार्फत फक्त कुणाला आजार आहे का? आशी चौकशी करुन सुचना दिल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भिती वातावरण आहे. याबत ग्रामपंचायत सरपंच , ग्रामसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 
ग्रामसेविका दीड महिन्यात दोन ते तीन वेळाच गावात हजर होत्या. सध्या कोरोनो आजारामुळे सर्व ग्रामसेवकांना संबंधित गावात मुख्यालयात हजर राहून नागरिकांना आरोग्य बाबत काळजी घेण्याबाबत सुचना करण्याऐवजी ग्रामसेवकांचा कारभार घरात बसुन चालत आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला किती गांभीर्य आहे हे यावरुन स्पष्ट झाले आहे. 
हा प्रश्‍न उत्तर तालुक्‍यातील एका गांवचा नसून अनेक गावात प्रशासनाच्या आदेशाला स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून हरताळ फासला जात आहे. तसेच बाहेर गावांहून आलेल्या नागरिकांची संख्या व वैद्यकीय तपासणी खरोखर झाली आहे का? याबाबत गावपातळीवर स्थानिक पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, आरोग्यसेवक, आशा वर्कर, सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांच्यात समन्वय नाही. यामुळे उत्तर सोलापूर तालुक्‍यात "कोरोना' आजाराबाबतीत "काखेत कळसा अन्‌ गावाला वळसा' होऊ नये म्हणजे मिळवलं. सध्या व्हाटसअप, फेसबुकवरुन अनेकजण कोरोनाबाबत ज्ञानाचे दिवे पाजळत आहेत. आपण स्वतः व आपल्या परिसरात कोरोबाबत किती सजग आहेत हा शोधाचा विषय आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur is not serious about Corona