अरारा..! "या' शहरातील शांतता कमिटीतच अशांतता पसरविणारे सदस्य 

तात्या लांडगे 
Thursday, 6 August 2020

पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत सात पोलिस ठाणे असून, आता प्रत्येक पोलिस ठाणे परिसरातील शांतता कमिटीतील सदस्यांवर किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे. काही पोलिस ठाण्यांकडून अद्याप माहिती मिळाली नसल्याने चारित्र्य पडताळणीचे काम थांबल्याची माहिती आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, मागील अनुभव पाहता शांतता कमिटीत सदस्यांची निवड करण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, यावर्षी चारित्र्य पडताळणी न करताच शांतता कमिटीची निवड झाली आहे. 

सोलापूर : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या जोडीला समाजातील प्रतिष्ठित व्यक्‍तींची मदत व्हावी, या हेतूने शांतता समिती नियुक्‍ती केली जाते. तत्पूर्वी, आयुक्‍तालयाकडे प्राप्त अर्जांची छाननी करून त्यांची चारित्र्य पडताळणी गरजेची आहे. मात्र, पोलिस आयुक्‍तालयाने निवडलेल्या शांतता समितीतच समाजात अशांतता पसरविणाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, आयुक्‍तालयाने तब्बल 580 जणांना शांतता समितीचे सदस्य केले आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग! "इथे' शंभर रुपयांत मिळतो जिल्ह्याबाहेर जाण्याचा ऑनलाइन पास 

पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत सात पोलिस ठाणे असून, आता प्रत्येक पोलिस ठाणे परिसरातील शांतता कमिटीतील सदस्यांवर किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे. काही पोलिस ठाण्यांकडून अद्याप माहिती मिळाली नसल्याने चारित्र्य पडताळणीचे काम थांबल्याची माहिती आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, मागील अनुभव पाहता शांतता कमिटीत सदस्यांची निवड करण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, यावर्षी चारित्र्य पडताळणी न करताच शांतता कमिटीची निवड झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियातून आनंद व्यक्‍त करीत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. परंतु, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या परस्पर या निवडी कोणी केल्या, संबंधित अधिकाऱ्यास शांतता कमिटीची निवड करण्यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्यांची नावे माहिती नव्हती का, असे प्रश्‍न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. 

हेही वाचा : Big Breaking ! गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री; "एवढे' कर्मचारी परस्पर सुटीवर 

शांतता कमिटीच्या बैठकाच नाहीत 
गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम या सण-उत्सवांबरोबरच जयंती, मिरवणुकांपूर्वी शहरात शांतता राहावी या हेतूने शांतता समितीची बैठक बोलावून नियोजन केले जाते. त्या बैठकीला महापालिकेचे अधिकारी, पोलिस आयुक्‍त, उपायुक्‍त, पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित असतात. आता गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाही शांतता कमिटीची बैठक झालेली नाही. कोरोनामुळे सण-उत्सव पूर्वीसारखे साजरा करण्यावर निर्बंध आहेत. मात्र, आता शांतता कमिटीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने बैठका घेण्यास अडचणीत येत आहेत. 

याबाबत विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट म्हणाले, शांतता कमिटीत 580 सदस्यांची निवड केली आहे. मात्र, त्यातील गुन्हे दाखल असलेल्यांची नावे कमी केली जाणार आहेत. त्यासाठी पोलिस ठाण्यांकडून गुन्ह्यांची माहिती मागविली असून, उर्वरित सदस्यांची चारित्र्य पडताळणी करून सदस्यांची अंतिम निवड केली जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Police Commissionerate has selected the members who spread unrest