उभ्या असलेल्या वाहनाला धडक; टेम्पोतील दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

स्त्याच्या कडेला उभा असलेल्या वाहनाला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोलापुर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ शिवारातील माळी यांच्या शेताजवळ पहाटे पाच वाजता झाला. 

मोहोळ (सोलापूर) : स्त्याच्या कडेला उभा असलेल्या वाहनाला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोलापुर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ शिवारातील माळी यांच्या शेताजवळ पहाटे पाच वाजता झाला. 
प्रभाकर राघोबा मोरे (वय 50क, रा. रबाळे, नवी मुंबई) व उत्तम इस्माईल सूर्यवंशी (वय 40, रा. डिग्गी जि. बिदर) अशी मृतांची नावे आहेत तर विनोद प्रभाकर मोरे (वय 26, रा. रबाळे, नवी मुंबई) असे जखमीचे नाव आहे. जखमीला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो केमिकल बॉक्स घेऊन पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शेटफळ शिवारातील बाळू माळी यांच्या शेताजवळ रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या वाहनाला सदर टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात वरील दोघांच्या पायाला व छातीला मार लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. अपघात होताच केमीकल ड्रम फुटल्याने परिसरात धुर निघु लागला. त्यामुळे  बराच वेळ जवळ जाता आले नाही. याबाबत उमेश संदिपान भोसले (रा. वरवडे) यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून, अधिक तपास हवालदार अविनाश शिंदे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Pune highway in accident Two killed one injured