सोलापूरकरांनो पाणी वापरा जपून : पाणीपुरवठा विस्कळीत, वीज गुल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

सोलापूर शहरास टाकळी हेड वर्क्‍स योजनेद्वारे पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 8) शहराला होणारा पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी केले आहे.

सोलापूर, : महावितरणकडून टाकळी हेड वर्क्‍सला होणारा विद्युत पुरवठा सोमवारी (ता. 7) दुपारी चार वाजल्यापासून वादळी वाऱ्यामुळे खंडित झाला आहे. त्यामुळे टाकळी येथून होणारा पाणी उपसा कमी होऊ लागला आहे. 

सोलापूर शहरास टाकळी हेड वर्क्‍स योजनेद्वारे पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 8) शहराला होणारा पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी केले आहे. जुन्या पाईपलाईनमुळे वारंवार गळीत होऊ लागल्याने महिन्यातील आठ-दहा दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्याचा फटका शहरवासियांना वारंवार सोसावा लागत आहे. आता त्यात वादळी वाऱ्यामुळे खंडीत झालेल्या वीज पुरवठ्याचाही फटका सोसावा लागणार आहे. 
दरम्यान, महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा करुन नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत नवा प्रस्ताव तयार केला जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, त्याबाबत अद्यापही काहीच हालचाली नसल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

संपादन : अरविंद मोटे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur residents use water wisely: Water supply is disrupted, electricity is cut off