सोलापूर ग्रामीणमध्ये 104 नवे कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 2 हजार 989 अहवाल शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्राप्त झाले होते. त्यातील 2 हजार 885 अहवाल निगेटिव्ह आले असून 104 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 115 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

कोरोना चाचणीचे 57 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 36 हजार 840 झाली आहे. त्यातील 34 हजार 648 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 1 हजार 111 ऍक्‍टिव कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 81 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये बार्शीमधील शिवाजीनगर येथील 68 वर्षीय महिला, करमाळा तालुक्‍यातील केडगाव येथील 65 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील तारापूर येथील 65 वर्षिय पुरुष आणि बार्शीतील खुर्पे बोळ येथील 65 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Teachers Constituency
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Marathi News Esakal
www.esakal.com