सोलापूर ग्रामीण मध्ये 183 नवे बाधित, कोरोनामुळे आतापर्यंत 1001 जणांचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Thursday, 19 November 2020

तालुकानिहाय बाधीत. कंसात मृतांची संख्या 
अक्कलकोट : 1149 : (69), बार्शी : 6105 (180), करमाळा : 2097 (51), माढा : 3506 (114), माळशिरस : 5978(123), मंगळवेढा : 1507 (44), मोहोळ : 1674 (84), उत्तर सोलापूर : 749 (36), पंढरपूर : 6787 (206), सांगोला : 2600 (44), दक्षिण सोलापूर : 1482 (50), एकूण : 33634 (1001) 

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 52 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील दोन हजार 869 अहवाल निगेटिव्ह आले असून 183 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना चाचणीचे 59 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. आज एकाच दिवशी 225 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील एकूण बाधित व्यक्तींची संख्या आता 33 हजार 634 झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील एक हजार एक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 207 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 31 हजार 426 झाली आहे. आजच्या अहवालांमध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील लक्ष्मी दहिवडी येथील 75 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील ओझेवाडी येथील 85 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur rural 183 newly infected, corona have killed 1001 people so far