सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ दिवसात 69 बळी तर 2200 रुग्ण सापडले 

सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ दिवसात 69 बळी तर 2200 रुग्ण सापडले 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील तीन दिवसांपासून दररोज 300 हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. तर दुसरीकडे मागील नऊ दिवसात तब्बल 69 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या नऊ दिवसाच्या कालावधीत 2200 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ही संख्या सर्वाधिक आहे. आज आलेल्या अहवालामध्ये 345 रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर एकाच दिवशी दहा जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता पाच हजार 902 एवढी झाली आहे. 

आज तडवळ (ता. अक्कलकोट) येथील 58 वर्षीय महिला, कुरनूर येथील 66 वर्षीय पुरुष, पोलिस लाइन पंढरपूर येथील 52 वर्षीय पुरुष, नवीन कराड नाका पंढरपूर येथील 56 वर्षीय पुरुष, पानगाव (ता. बार्शी) येथील 38 वर्षीय महिला, वैराग (ता. बार्शी) येथील 82 वर्षीय पुरुष, कसबा पेठ माढा येथील 48 वर्षीय पुरुष, खैराव येथील 75 वर्षाचे पुरुष, जवळा (ता. सांगोला) येथील 45 वर्षीय पुरुष तर अकलूज येथील 65 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज सर्वाधिक 124 रुग्ण पंढरपूर तालुक्‍यात आढळले आहेत. त्याखालोखाल माळशिरस व बार्शी तालुक्‍याचा समावेश आहे. 

अक्कलकोटमधील समर्थनगर, ग्रामीण रुग्णालय, स्वामी समर्थनगर, बोरोटी, कर्जाळ, जेऊर, नन्हेगाव, तोळणूर, करमाळ्यातील घोलपनगर, जामखेड रोड कोर्टी, मंगळवारपेठ फंड गल्ली, पिंपळवाडी, शेलगाव (वां), आवाटी, मंगळवेढ्यातील आंधळगाव, खोमनाळ येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज रोड, अकलूज, बागेचीवाडी, चाकोरे, धर्मपुरी, कण्हेर, महाळूंग, माळीनगर, पळसमंडल, पिलीव, पिंपरी, संगम, श्रीपूर, वेळापूर, यशवंतनगर, मोहोळमधील नागनाथ गल्ली, वडवळ, पाटकूल, कुरुल, कामती बु, देगाव (वा), अनगर, माढ्यातील हनुमानमंदिराजवळ, कुटे प्लॉट, कुर्डुवाडी, लऊळ, मोडनिंब, निमगाव टे, दक्षिण सोलापुरातील बरूर, हत्तूर, मंद्रूप, मुस्ती, सांगोल्यातील बामणी, घेरडी, जवळा, कडलास, कोष्टी गल्ली, महूद, वासूद, उत्तर सोलापुरातील कोंडी, कळमण, मार्डी, पंढरपुरातील आढीव, चंद्रभागा घाट, गाताडे प्लॉट, घनशाम सोसायटी, गोविंदपुरा, गोपाळपूर, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कैकाडी मठ, करकंब, कर्मयोगीनगर, कासेगाव, काशीकापड गल्ली, कोळी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, महात्मा फुले चौक, मेंढे गल्ली, नागपूरकर मठ, नवीपेठ, नवीन कराड नाका, बडवे चौक, काळा मारुती मंदिर परिसर, ओझेवाडी, पंचमुखी मंदिर परिसर, परदेशी नगर, पोलिस लाइन, रुक्‍मिणीनगर, सह्याद्रीनगर, संतपेठ, समतानगर, सरकोली, सावरकरनगर, शेगाव दुमाला, शिवक्रांतीनगर, शुक्रवारपेठ, तन्हाळी, तिरंगानगर, उन्नती रेसिडेन्सी, उत्पाद गल्ली, विजापूर गल्ली, विणे गल्ली, विठ्ठलनगर, वाघोली बिल्डींग येथे कोरोना रुग्ण आढळून आले. बार्शीतील आडवा रस्ता, आगळगाव रोड, अलिपूर रोड, आझाद चौक, भवानी पेठ, भोगेश्‍वरी मंदिराजवळ, बुरुड गल्ली, डाणे गल्ली, दत्तनगर, गाताचीवाडी, घारी, जामगाव रोड, कासारवाडी रोड, कव्हे, खुरपे बोळ, लोखंड गल्ली, लोकमान्य चाळ, मंगळवार पेठ, नाईकवाडी प्लॉट, परंडा रोड, पाटील चाळ, सारोळा, स्वराज कॉलनी आणि उपळाई रोड येथेही नव्या रुग्णांची भर पडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com