सोलापूर ग्रामीणमध्ये 85 नवे कोरोनाबाधित, 156 कोरोनामुक्त 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 903 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 818 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 156 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 40 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 33 हजार 448 झाली आहे. कोरोना मुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील 998 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 607 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागातील 30 हजार 843 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. 
आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील उंबरे पागे येथील साठ वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील गार्डी येथील 50 वर्षीय महिला, माढा तालुक्‍यातील बेंबळे येथील 70 वर्षीय पुरुष आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील हत्तुर येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com